loader
Breaking News
Breaking News
Foto

सोशल मीडिया देखील येणार कायद्याच्या अखत्यारित; सर्वोच्च न्यायालयाकडून फेसबुक आणी ट्विटर ला नोटिस

खोट्या बातम्या पसरवणे किंवा अफवा पसरवणे यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात काही नतद्रष्ट लोक करताना दिसतात.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावर अंकुश ठेवण्यासाठी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने फेसबूक आणि ट्विटर ला यासंबंधात आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

सोशेल मिडियावर न्यायालयाचे निर्बंध आल्यास भडकावु पोस्टला आळा बसेल आसे बोलले जात आहे

वैभव फरतडे-मुंबई प्रतिनिधी✍

(जनहित याचिकेतील मुद्दे!) ◼️व्हायरल होणाऱ्या आक्षेपार्ह, भडकावू मजकुराबाबत फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हाट्सॲप या सोशल नेटवर्किंग साईट्स ना जबाबदार धरा. ◼️सोशल मीडियातील भडकावू मजकूर, खोटय़ा बातम्या काही वेळांतच आपोआप डिलीट होतील, अशा प्रकारची प्रणाली सरकारने कार्यान्वित करावी. ◼️जबाबदार लोकांविरोधात फौजदारी खटला चालवण्यासाठी सरकारने स्वतंत्र कायदा बनवा

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सोशल मीडियातील भडकावू मजकूर, खोट्या बातम्या काही वेळातच आपोआप डिलीट होतील, अशी प्रणाली सरकारने कार्यान्वित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts