loader
Breaking News
Breaking News
Foto

आता सदस्यांना लागले आरक्षणाचे वेध! आरक्षणा वर ठरणार गावचा कारभारी

करमाळा तालुक्यातील ५१ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली आहे. दरम्यान आता नवनियुक्त सदस्यांचे सरपंच आरक्षणा कडे लक्ष लागले आहे . अनेक जण सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग तयार आहेत मात्र अनेक बहुमत असलेल्या पॅनेल मध्ये राखीव उमेदवार नसल्याने धाकधुक वाढली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तालुक्यात ३९१ जागांसाठी ८६० उमेदवार रिंगणात उतरले होते निकाला नंतर आता विजयी उमेदवारांना सरपंचपदाचे वेध लागले आहेत. राज्य सरकारने यापूर्वीच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडती रद्द केल्यामुळे नव्याने सोडती होणार असून २७ जानेवारीपर्यंत सरपंच पदाच्या आरक्षणाची घोषणा होणार आहे तर, फेब्रुवारी आखेरीस  सरपंच आणि उपसरपंचपदांच्या निवडणूक प्रक्रिया पार पडतील आशी शक्यता वर्तविण्यात येत आहे

२७ जानेवारी रोजी होणार आहे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

=सरकारच्या निर्णयामुळे गोंधळ= यापूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेमधूनच सरपंचाची निवड करण्यात येत होती. फडणवीस सरकारने यासंबंधीचा नवीन निर्णय लागू केला होता. परंतु त्यानंतर महाविकास आघाडी सरकाने जुनी पद्धत कायम ठेवत फडणवीस सरकारचा निर्णय रद्द केला होता. त्याअंतर्गत निवडणुकीपूर्वीच सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षित काढण्यात येत होते. परंतु महाविकास आघाडी सरकारने त्यातही बदल करत घोडेबाजार थांबवण्यासाठी निवडणुकीनंतरच सरपंच पदाचे आरक्षण काढण्याचे जाहीर केले आहे. सदर निर्णय या निवडणुकीपासून लागू करण्यात आला आहे.त्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षणसंदर्भात निवडुण आलेल्या सदस्यांसह सामान्य नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. अनेक गावात बहुमत आसेल्या पॅनेल मध्ये अनुसूचित, तसेच मागासप्रवर्गातील उमेदवार नसल्याने नेमके तेच आरक्षण पडले तर सरपंच कोणाचा होणार या विषयी उलट सुलट चर्चा सुरु आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आरक्षण निघालेला उमेदवार गळाला लावण्यासाठी घोडेबाजार होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे खऱ्या आरक्षित माणसाला न्याय मिळण्यासाठी, घोडेबाजार थांबण्यासाठी, प्रामाणिक माणसांना न्याय मिळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सरकार सांगत आसले तरी या निर्णयाचे परिणाम निवडी नंतरच दिसुण येणार आहेत, आरक्षणा मुळे जनतेने नाकारलेल्या पॅनेल मधील सरपंच होण्याची शक्यता अनेक गावात निर्माण झाली असुन असे झाले तर बहुमत असलेल्या पॅनेलची "दैवाने दिले कर्माने नेले!" स्थीती होणार आहे बहुमत नसेल्या पॅनेलचा आरक्षणाच्या जोरावर सरपंच झाला तर उपसरपंच मात्र बहुमत असणाराचा होवु शकतो ,तसेच सरपंचाने घेतलेले निर्णय उपसरपंच व सदस्य मिळुण हाणुण पाडु शकतात त्या मुळे "निवडणुकीनंतर आरक्षण"हा कायदा गावाच्या विकासाला आडकाठी ठरणार का अशा शंका देखील उपस्थित होवु लागल्या आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts