loader
Breaking News
Breaking News
Foto

आता प्रतिक्षा निकालाची! उमेदवारांची घालमेल वाढली .

करमाळा तालुक्यात तब्बल ५१ गावांची ग्रामपंचायत निवडणुक जाहीर झाली होती त्या पैकी सालसे व जेऊरवाडी हि दोन गावे बिनविरोध झाल्याने उर्वरित ४९ गावात निवडणूकांची रणधुमाळी पहावायस मिळाली .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

३९१ जागांसाठी तब्बल ८६० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. ऐनवेळेला सरपंदाचे आरक्षण १८ तारखेनंतर जाहीर होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केल्याने सरपंच पदाचा उमेदवार ठरवताना गाव पुढाऱ्यांची धांदल उडाली . मागील आरक्षण चा विचार करुन काही राखीव उमेदवार सुरक्षित वार्डातुन निवडुण आण्यासाठी पॅनेल प्रमुखांनी मोर्चेबांधणी केली आहे,मात्र असे आसले तरी सरपंच पदाचे आरक्षण निघालेला उमेदवार पराभूत झाल्यास काही ठिकाणी "गड आला पण सिंह गेला" आशी परिस्थिती निर्माण होवु शकते.मात्र आरक्षण व विजयाच्या घोषणे आगोदरच अनेकाजण सरपंच पदाचे बाशींग बांधुण तयार आहेत.

तालुक्यातील ,मांगी देवळाली ,शेटफळ या गावच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

निकालासांठी फक्त आजची रात्र बाकी आसुन उद्या सकाळी ०९ वाजल्यापासून निकाल हाती येण्यास सुरुवात होईल व दुपारपर्यंत पर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे ,उमेदवार व पॅनेल प्रमुखांनी आतापासूनच देव पाण्यात ठेवले असुन सर्वांचा जिव टांगणीला लागला आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सोशेल मिडियावर प्रचारात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांकडून "गुलाल आमचाच " आसे स्टेटस ठेवुन वातावरण तापवण्यास सुरवात केली आहे .सर्वच ठिकाणी चुरशीची लढाई झाल्याने उद्या निकाला दिवशी ठस्सल पहावाय मिळणार आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts