loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा उद्योजक लॉबी आयोजित महारक्तदान शिबिरास राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद

२७ डिसेंबर रोजी मराठा उद्योजक लॉबी (MUL) परिवाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांच्या रक्ताच्या भीषण तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाची नितांत गरज आहे. या आवाहनाला साद देत. महाराष्ट्राच्या रक्तसंकटात मदत करण्यासाठी महाराष्ट्र MUL टीम ने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळी महारक्तदान सोहळा आयोजित केला होता

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यास संपूर्ण महाराष्ट्र MUL टीम ने साथ व जोरदार प्रतिसाद देत 25 हुन अधिक ठिकाणी महारक्तदान शिबीरे आयोजित केले होते.. या उपक्रमास नागरीकांनी भरभरून प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने रक्तदान करून या उपक्रमास रेकॉर्डब्रेक ठरविले. या उपक्रमात मराठा उद्योजक लॉबी राज्य कार्यकारिनी कोर कमिटीच्या सूचनेनुसार सर्व जिल्हा, तालुकास्तरीय MUL कार्यकारिणीने चोख नियोजन करीत हा उपक्रम यशस्वी केला

वैभव फरतडे-मुंबई प्रतिनिधी✍

याबद्दल मराठा उद्योजक लॉबीने या महारक्तदान सोहळ्यास प्रोत्साहन देणाऱ्या रक्तदात्याना रक्तदान केल्याबद्दल त्यांचे शतशः आभार मानले आहेत

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मराठा उद्योजक लॉबी च्या वतीने घेण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे राज्यभरातून कौतुक होत आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts