loader
Breaking News
Breaking News
Foto

उंदरगावात दिसला पुन्हा बिबट्या! तो नरभक्षक नसल्याचा वनविभागाचा दावा! शोधमोहीम सुरुच राहणार-विजय बाटे

करमाळा तालुक्यात दहशत माजवणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने काल खासगी शार्प शूटर च्या मदतिने खात्मा केला आसला तरी उंदरगावात आज पुन्हा बिबट्या दिसला असल्याने काळजी चे वातावरण आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

वांगी परिसरात शोधमोहीम सुरु असताना उंदरगावात बिबट्या दिसला होता त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी उंदरगावात परिसरात दाखल झाले होते मात्र नंतर पहाटे बिबट्या पुन्हा वांगी भागात दिसल्याने उंदरगाव व वांगी येथील बिबट्या वेगवेगळे आसल्याचे चर्चा सुरु होती .दरम्यान काल झालेल्या चकमकीत नरभक्षक बिबट्यास ठार करण्यात वनविभागास यश आले आहे त्यामुळे सध्या तालुक्यातील नागरीकांचा जिव भांड्यात पडला आहे मात्र आज उंदरगावात तन नाशक फवारणी करण्यासाठी गेलेले शेतकरी किसन कांबळे यांना शेतात बिबट्या दिसुन आला आहे ,शंभर मिटर वरुन त्यांनी बिबट्या पाहीला आसल्याचा दावा त्यांनी केला असुन परिसरात ठसे देखील आढळुन आले आहेत ,कांबळे हे ग्रामपंचायत सदस्य आहेत ,पुन्हा बिबट्यास सदृश्य प्राणी दिसल्याने काळजीचे वातावरण आहे .

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

दरम्यान सा चौफेर चे प्रतीनीधींनी वनविभाग चे आधीकारी विजय बाटे यांच्याशी संपर्क साधला आसता नरभक्षक बिबट्या हा एकच होता तो ठार झाला आहे त्या मुळे घाबरण्याचे कारण नसुन वनविभाग अजुनही सतर्क आहे शोधमोहीम सुरु आहे बिबट्यासदृस्य प्राणी दिसल्यास आम्हाला संपर्क करावा तसेच सावधानीपूर्वक रहा आसे आवहान केले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

विश्वहिंदु परिषदेचे संतोष वाळुंजकर यांनी देखील वनविभागाच्या आधीकार्याशी संपर्क साधुन परिसरातील ठशांचे फोटो व्हटसप केले आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts