loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी सरपंच संजय नवलडे यांची कार्यतत्परता,चुकलेला वृद्धास एक तासात काढले शोधुन!

करमाळा तालुक्यातील आवाटी या गावातील सदर वयोवृद्ध ग्रामस्थ पुणे येथे आढळून आले होते व ते सध्या पिंपरी चिंचवड येथील एका कंपनीसमोर वेड्यासारखे फिरत होते कंपनीतील बाळासाहेब पाटील यांनी त्यांना जेवण वगैरे देऊन दिले होते व त्यांचेबद्दलची माहिती "पंढरपूर लाईव्ह" या न्युज पोर्टल ला दिली होती .तसेच यांचेबद्दल कुणाला काही माहिती असेल तर 8308053996 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन श्री.पाटील यांनी केले होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सदरची बातमी माजी सरपंच संजय नलवडे यांच्या पर्यंत पोहचताच त्यांनी तात्काळ पिंपरी चिचवड येथील संबंधित कंपनीच्या ठिकाणी भेट दिली व पाटील यांना फोन करुन चौकशी केली व आवाटी येथील चुकुन भटकत आसलेल्या दामु आबा शिंदे यांना आपल्या फॉर्चुनर गाडीतून स्वत:चे घरी नेवुन सर्व व्यवस्था केली .

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

दामु शिंदे यांचे मानसिक संतुलन ढासळले असुन ते कधी चुकुन आलो आहो,रुसुन आलो आहे ,वर्षभर झाले पुण्यात फिरतो आहे असे सांगत होते ,माजी सरपंच संजय नलवडे यांनी गावातील शिंदे यांच्या पुतण्याकडे निरोप देऊन दामु शिंदे यांच्या विषयी माहीती दिली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

संजय नलवडे हे मुळचे आवाटी येथील असुन पुणे येथे त्यांचा स्वतःचा उद्योग आहे ,आवाटी गावचे ते माजी सरपंच आहेत ,त्यांच्या या कार्याचे सध्या कौतुक होत आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts