loader
Breaking News
Breaking News
Foto

कुमठे, कोरेगावचे जलस्त्रोत 'जरंडेश्वर'मुळे दूषित ,आरोग्यास दूषित पाण्याचा बंदोबस्त करण्याची कुमठे ग्रामस्थांची तहसीलदारांकडे मागणी

जरंडेश्वर शुगर मिलमधून उघड्यावर सोडलेल्या दूषित पाण्यामुळे कुमठे, करेगावसह पाच गावाच्या परिसरामध्ये नैसर्गिक जलस्त्रोत दूषित झाले असून, आरोग्यास हानिकारक असलेल्या या दूषित पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी कुमठे ग्रामस्थांनी केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यासंदर्भात कुमठे ग्रामस्थांच्या वतीने हणमंत जगदाळे, महेश जगदाळे, गोरक्ष जगदाळे , सुहास ढाणे, सागर जगदाळे, नरेश बर्गे, संभाजी चव्हाण, अनिल रोमण, मिथुन जगदाळे, सुनील वाघ, आसरे आमपंचायतीचे सरपंच दीपक सणस, उपसरपंच अशोक सणस, श्रीकांत सणस, अॅड. भैय्यासाहेब जगदाळे, एकनाथ जरहे, प्रशांत सणस आदीप्रमुखांसह ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयामध्ये नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे यांच्याकडे निवेदन दिले आहे.

संचित जगदाळे ✍ (चौफेर प्रतीनिधी सातारा)

त्यात म्हटले आहे, की आमच्या गावाच्या दक्षिण बाजूस सुमारे चार किलोमीटरअंतरावर जरंडेश्वर शुगर मिल हा साखर कारखाना असून, या कारखान्याने चालू गळीत हंगामात दूषित पाणी उघड्यावर सोडले आहे. हे दूषित पाणी जांभळ ओढ्याद्वारे वाहून येऊन चिमणगाव, सांगवी, कुमठे, आसरे, कोरेगाव परिसरातील विहिरी, कूपनलिका व नैसर्गिक जलस्त्रोत पूर्णपणे दूषित झाले आहेत.परिणामी नागरिकांसह पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रदूषित पाण्याचे नमुने घेऊन रासायनिक पृथक्करण करावे व त्याचा अहवाल मिळावा. प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण कारखाना प्रशासनास योग्य त्या सूचना करून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून येणाऱ्या दूषित आणि आरोग्यास हानिकारक असलेल्या पाण्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, असेही या निवेदनात नमूद केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दरम्यान, कुमठे ग्रामस्थांनी नैसर्गिक जलस्त्रोत दूषित होत असल्याबाबतच्या निवेदनाच्या प्रती जिल्याचे पालकमंत्री, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, गटविकास अधिकारी व कुमठे प्रामपंचायत कार्यालयासही दिल्या आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts