loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रा .रामदास झोळ यांनी 'या' साठी मानले पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार!

डिकसळ ते डिकसळ पुल या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा रामदास झोळ हे अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत होते.या भागातील ग्रामपंचायततीचे ठराव मंजूर करुण मंत्रीमंडळ व प्रशासना पर्यंत पोहचवण्यापर्यंत त्यांनी बारकाईने लक्ष दिले होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

अखेर या मागणीस यश आले असून डिकसळ ते डिकसळ पुल या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अंदाजे दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे त्यामुळे या भागातील मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे डिकसळ ते डिकसळ पुल या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अंदाजे दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे अशी माहिती आज सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ताञय मामा भरणे यांनी दिली.

चौफेर प्रतिनिधी ✍

पदवीधर निवडणुकींच्या दरम्यान उमेदवार आरुण लाड ,पालकमंत्री भरणे व झोळ यांची भेट झाली होती या भेटी दरम्यान प्रा रामदास झोळ यांनी डिकसळ ते डिकसळ पुलाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते, तेव्हा पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करुन लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावु असे आश्वासन दिले होते. तसेच विधानसभेचे आमदार संजय मामा शिंदे , भिगवण गटाचे जि.प.सदस्य हनुमंत बंडगर व सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे जिल्हा व सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापुर तालुका यांच्याडेही या मागणीची प्रत देण्यात आली होती, असे प्रा.झोळ सरांनी सांगितले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सदरचा रस्ता हा अत्यंत खराब झाला असुन या रस्त्याचा वापर भिगवण, बारामती, पुणे या ठिकाणी विविध गरजांसाठी केला जातो, शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या रस्त्यानी दैनंदिन ये जा करताना खुप ञास सहन करावा लागत आहे म्हणुन या रस्त्याने लोकांची व शालेय विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड व ञास कमी व्हावा यासाठी आम्ही या रस्त्याचे काम अत्यंत जलदगतीने व्हावे अशी मागणी ना.दत्ताञय भरणे मामांकडे केली होती व आज रोजी या रस्त्यासाठी ना.भरणेमामंनी निधी मंजूर करुन आणल्याबद्दल आम्ही मामांचे आभारी आहोत असे प्रा.झोळ सर यांनी सा चौफेर शी बोलताना सांगीतले .सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने प्रा रामदास झोळ यांचे या भागातुन कौतुक होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts