करमाळा तालुक्यात बिबट्याने धुमाकुळ घातल्या पासुन वनविभाग च्या पथका बरोबर करमाळा पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे व त्यांचे सहकारी डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहेत स्वतः पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे जनतेला दररोज सोशेल मिडियावर पोस्ट टाकुन बिबट्या बाबत माहिती देवून सतर्क करत आहेत आज त्यांनी दिलेली सविस्तर माहीती नक्की वाचा
मागील तीन दिवसांमध्ये दिनांक 13, 14 व 15 डिसेंबर रोजी बिबट्याचे वास्तव्य वांगी किंवा परिसरातील गावांमध्ये असल्याचे जरी दिसून आले नसले तरी बिबट्या या परिसरातून बाहेर गेल्याचे देखील कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे वांगी व आजूबाजूच्या गावाच्या शिवारातील ग्रामस्थांनी अजूनही सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हा परिसर सोडून बिबट्या पांगरे, सांगवी, कविटगाव किंवा त्या परिसरातील इतर गावात गेला असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. म्हणून ढोकरीपासून वांगी, पांगरे ते कंदर पर्यंतच्या सर्व गावातील व शिवारातील ग्रामस्थांनी बिबट्याच्या संदर्भात असलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी शार्प शूटरची व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेऊन तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करुन त्याला ठार मारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
काल रात्री 10 वाजता श्री धेर्यशील पाटील साहेब, डीसीएफ, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली चारचाकी गाडीच्या टपावर मचाण तयार करून शार्प शूटर डॉ श्री चंद्रकांत मंडलिक तसेच वनरक्षक एस ए कळसाईत पहाटे 4 वाजेपर्यंत बिबट्याच्या हालचाली मॉनिटर करण्यासाठी ढोकरी व बिटरगाव शिवारात बसले होते. (सोबत त्यांचे फोटो दिले आहेत.) सर्च लाईट मारणे कामी वनरक्षक श्री संतोष मुंढे तसेच डॉट एक्स्पर्ट श्री अनिल अवचिते हे त्यांना मदत करत होते. या टीमला कव्हर करण्यासाठी वन खात्याची दुसरी टीम रवींद्र गावते यांच्याबरोबर 100 मीटर अंतरावर कार्यरत होती. भयान काळोख्या रात्री गर्द ऊस व केळीच्या बागायती रानामध्ये बिबट्याला पकडण्याच्या किंवा ठार करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन वरील सर्वजण रात्रभर जागून देखील त्या परिसरात बिबट्याच्या हालचाली किंवा अस्तित्व जाणवले नाही म्हणून वरील टीमने पहाटे 4 ते 5.30 वा.पर्यंत ढोकरी, बिटरगाव, वांगी परिसर तसेच शेलगावपर्यंत रस्त्याने नाईट सर्च केला. या काळात त्यांना कोठेही बिबट्याच्या हालचाली आढळून आल्या नाहीत. ज्या नरभक्षक बिबट्याच्या शोधासाठी वनखात्याचे अधिकारी-कर्मचारी तसेच शार्प शूटर व पोलीस खाते स्वतःचे कुटुंब कोसो दूर असताना, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता दिवसातील अठरा ते वीस तास राबत आहेत त्यांचे मनोबल उंचावण्याच्या दृष्टीने त्या त्या भागातील ग्रामस्थांनी व सुजाण नागरिकांनी त्यांना नैतिक पाठिंबा देणे गरजेचे असताना काही लोक बेजबाबदारपणे, स्वतःची नैतिक जबाबदारी विसरून, सवंग लोकप्रियतेसाठी बेछूट आरोप करत आहेत. काल तर ढोकरी परिसरात एका व्यक्तीने वनविभागाच्या महिला अधिकाऱ्याला असभ्यपणे बोलल्याची माहिती मिळाली असून संबंधित महिला अधिकारी कर्तव्यावरून करमाळा येथे निघून गेल्याची देखील चर्चा ऐकण्यात आली. अशा वक्तव्यामुळे वनखात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तसेच शार्प शूटर यांचे मनोधैर्य कमी होत आहे अशी देखील माहिती मिळाली आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.