loader
Breaking News
Breaking News
Foto

खा रणजितसिंह निंबाळकर यांनी पाळला शब्द! बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी केली मोठी मदत.

करमाळा तालुक्यात नरभक्षक बिबट्याने तिघांचा बळी घेतला आसुन अनेक मुक्या जनावरांचा फडशा पाडला आहे त्या मुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी कमालीचे दहशतीत आहेत

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

बिबट्याने हल्ला केल्यानंतर खा रणजितसिंह निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली होती व राज्यसरकारने तात्काळ हेलीकॉप्टर ची सोय करावी अन्यथा आम्ही व्यवस्था करु आसा शब्द दिला होता ,चार ते पाच दिवस उलटुन गेल्यानंतर देखील राज्यसरकारने हेलीकॉप्टर ची सोय केली नव्हती .अखेर खा रणजितसिंह निंबाळकर यांनी आज हेलीकॉप्टर ची सोय केली आहे. खा रणजितसिंह निंबाळकर यांनी आपला शब्द पाळला आसल्याने तालुक्यातुन त्यांचे कौतुक होत आहे

खा रणजितसिंह निंबाळकर यांनी दिलेला शब्द पाळला आहे मात्र पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी दोन दिवसात बिबट्याचा बंदोबस्त करु आसा शब्द दिला होता मात्र आठ दिवस झाले तरी प्रशासनास बिबट्याचा बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे.

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

खा रणजितसिंह निंबाळकर यांनी हेलीकॉप्टर ची व्यवस्था केल्यानंतर भाजापा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार समीर माने यांची भेट घेऊन तात्काळ हेलिपॅड साठी परवानगी देण्याची व हेलीपॅड ची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी तालुका सरचिटणीस सुहास घोलप, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे , किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे ,मनोज मुसळे आदिजन उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts