loader
Breaking News
Breaking News
Foto

डिजेल नसल्याने एस टी च्या फेऱ्या रद्द? बस आगारात घाणीचे साम्राज्य, मनसेचा आंदोलनाचा इशारा !

करमाळा आगारातील एस टी च्या अनेक फेऱ्या अचानक रद्द झाल्या आहेत, त्या मुळे विद्यार्थ्यी व प्रवाशी यांचे हाल होत आहेत अधीक माहिती घेतली आसता डिजेल उपलब्ध नसल्याने फेर्‍या रद्द कराव्या लागल्या आसल्याची सूत्रांकडून हाती आली आहेया संदर्भात आगार प्रमुख अश्विनी किरगत यांच्याशी संपर्क साधला आसता मी रजेवर आसल्याने मला याबाबत काहीही माहीती नसल्याचे सांगीतले तसेच सध्या कोण माहीती देवु शकेल असे विचारले आसता सविस्तर देण्यास टाळाटाळ करुन फोन कट केला .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोरोना च्या संकटात सर्वच घटकांना आर्थिक तोटा सहन करावा लागला ,एसटी महामंडळ देखील याला आपवाद राहीले नाही आगोदरच संकटात आडकलेले एसटीचे चाक कोरोना कालावधी मध्ये पुरते रुतुन बसले आहे , एस टी च्या पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी शासन व महामंडळ विविध उपायोजना आखत आहे ,करोना नंतर पुन्हा एखदा एस टी धावायला सुरु झाली आहे प्रवासी वाहतूक बरोबर एस टी ने मालवाहतूक देखील सुरु केली पाचशे किलो पर्यंत माल व भाजीपाला देखील वाहण्यास सुरवात केली आहे.

मनसेचा आंदोलनाचा इशारा

चौफेर प्रतिनिधी ✍

करमाळा आगारात मात्र आगार व्यवस्थापकांच्या चुकीच्या व्यवस्थापानामुळे एस टी ला फटका बसत आसल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमण झाली आहे ,आज एस टी ने अनेक गावातील सुरु केलेल्या फेऱ्या पुन्हा बंद केल्या आहेत तर सुरु आसलेल्या बसेस देखीलवेळेवर धावत नाहीत. या धरसोड पणा मुळे प्रवासी एस टी कडे वळत नाहीत ते खासगी प्रवासी वाहतूकीचा पर्याय निवडत आसल्याचे मनसेचे म्हणने आहे. तसेच करमाळा आगारात स्वच्छतेच्या तिन तेरा वाजल्या आसुन अनेक मोकाट जनावरे, व त्यांच्या मलमुत्राचा प्रवाशांना त्रास होत आहे.अंतर्गत रस्ते पुर्ण पणे खराब झाले असुन धुळीचे लोट उडत आहेत प्रवाशांसाठी सॅनेटायझरआज उपलब्ध नाही आज डिजेल नसल्याने एस टी च्या फेऱ्या रद्द होणार असतील तर हे आगार प्रमुख यांचे अपयश आहे आशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी व्यक्त केली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा बस आगारास आमची नेहमीच सहकार्याची भुमीका राहीली आहे ,बस आगारात चोरीच्या च्या घटना वाढल्यानंतर धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान च्या वतीने आम्ही सिसिटिव्ही कॅमेरे उपलब्ध करुन दिले आहेत,जेणेकरून एस टी ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना झळ बसु नये परंतु सध्या आगार व्यवस्थापकच बसस्थानकाच्या प्रवाशांच्या सुविधा कडे दुर्लक्ष करत आहेत जिल्हा आगार व्यवस्थापक यांनी लक्ष घालावे -संजय घोलप _मनसे तालुकाध्यक्ष

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts