स्त्रियांचा राजकारणातील सहभाग लोशाहीला बळकटी देणारा ठरेल असे मत राष्ट्रवादीच्या जिल्हाउपाध्यक्षा तृप्तीताई साखरे यांनी व्यक्त केले खा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने कोर्टी ता करमाळा येथे " महिला सरपंचांचा गुणगौरव" कार्यक्रम आयोजित केला होता या वेळी त्या बोलत होत्या.
या वेळी अधीक बोलताना साखरे म्हणाल्या की आणि ‘स्त्री सक्षमीकरण’ या विषयावर अनेकजण बोलत आसतात पंरतु प्रत्यक्षात मात्र खऱ्या आर्थाने स्त्रि सबलीकरण आजुनही झाले नाही स्त्रियांनी चुल आणी मुल यातच अडकुन रहावे अशीच सर्वांची अपेक्षां आसते यातुन पण स्त्री राजकारणात आली तर तिने फक्त नामधारी भुमिकेत रहावे हिच अनेकांची मानसिकता आहे हे दुर्दैव आहे, स्वयंसाहाय्यी गट, कृतिगट, सामाजिक चळवळी, सोशल मीडिया, निवडणुका आदी माध्यमातून लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेत स्त्रिया सक्रिय झाल्या आहेत स्त्रियांचा हा सहभाग लोकशाहीकरणाला बळकटी आणणारा असुन समाजकारण व राजकारणात स्त्रियांनी उचललेला वाटा लक्षात घेता भविष्यात ग्रामीण भागातील या रणरागीणी राज्यपातळीवर ठसा उमटवतील आसा विश्वास देखील तृप्तीताई साखरे यांनी व्यक्त केला
कार्यक्रमात उत्तुंग काम करणाऱ्या महिला सरपंच, गुणवंत शिक्षिका, कोव्हिड काळात उत्कृष्ट काम केलेल्या परिचारिका,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा गुणगौरव करण्यात आला, यावेळी महिला सरपंच लता मारकड(उमरड),सविता भगवान तनपुरे(वरकटने),गायत्री महेशकुमार कुलकर्णी(मांजरगाव),मनीषा बाळासाहेब कावळे(रामवाडी) तसेच शिक्षिका ज्योती बोटकर, ज्योती शिंदे, गोसावी मॅडम, टेकाळे सिस्टर,अंगणवाडी सेविका अंजना मेढे, आशा वर्कर हसीना शेख यांचा गुणगौरव करून प्रशस्तीपत्र देण्यात आले यावेळी पवार साहेबांच्या महिला धोरणा विषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिलादेवी झांजुर्णे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्षा तृप्ती ताई साखरे ,ऍड.सविताताई शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष विजयमाला चवरे,शहराध्यक्ष राजश्री कांबळे, डॉ विद्या दुरंदे यांच्यासह श्रीकांत साखरे , गौरव झाजुर्णे,अश्पाक जमादार, बाळासाहेब कावळे, महेशकुमार कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा नलिनी ताई जाधव यांनी केले होते.या वेळी सरपंच मनीषा कावळे यांनी छान मनोगत व्यक्त केले महिलांविषयी असे कार्यक्रम ग्रामीण भागात राबवण्याची गरज आहे, साहेबांच्या वाढदिवसानिम्मित आमचा महिला सरपंचांचा सन्मान केला हे आमच्यासाठी खूप भूषणावह आहे आसे त्यानी सांगीतले
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.