loader
Breaking News
Breaking News
Foto

24 तासात कोरोनाचा खात्मा करणारे औषध सापडले !शास्त्रज्ञांचा दावा.

कोरोनाव्हायरसविरोधातील (coronavirus) लशीसह त्यावरील प्रभावी औषधांचाही (coronavirus medicine) शोध सुरू आहे. शास्त्रज्ञ वेगवेगळ्या औषधांचं ट्रायल करून पाहत आहेत. आता शास्त्रज्ञांना कोरोनाविरोधात प्रभावी असं औषध सापडलं आहे. हे औषध फक्त 24 तासांतच कोरोनाचा खात्मा करण्यात सक्षम आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. एमके-4482/ईआइडीडी-2801 नावाचं हे औषध. या औषधाला मोल्नुपिरावीर (Molnupiravir) म्हणूनही ओळखलं जातं. हे औषध कोरोना संक्रमण पसरण्यापासून रोखू शकतं. याशिवाय कोरोना रुग्णांना भविष्यात होणाऱ्या इतर आजारांपासूनही त्यांना वाचवू शकतं, असं शास्त्रज्ञ म्हणाले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

अमेरिकेतील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे औषध शोधलं आहे. फर्स्टपोस्टच्या रिपोर्टनुसार जर्नल ऑफ नेचर माइक्रोबायोलॉजीमध्ये या औषधाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. संशोधनाचे अभ्यासक रिचर्ड प्लेंपर यांनी सांगितलं, सुरुवातीच्या अभ्यासात हे औषध इन्फ्लूएन्झासारख्या फ्लूचा नाश करण्यात परिणामकारक दिसून आलं होतं. त्यानंतर कोरोनाव्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी यावर अभ्यास करण्यात आला. काही प्राण्यांना कोरोना संक्रमित करण्यात आलं. जसं त्यांनी नाकामार्फत कोरोनाव्हायरस बाहेर सोडणं सुरू केलं तेव्हा त्यांना लगेच मोल्नुपिरावीर औषध देण्यात आलं. या कोरोना संक्रमित प्राण्यांना निरोगी प्राण्यांसह एकाच पिंजऱ्यात ठेवण्यात आलं. जेणेकरून औषध दिल्यानंतर व्हायरस पसरतो की नाही हे समजू शकेल. संशोधनाचे अभ्यासक जोसेफ वुल्फ यांनी सांगितंल, संशोधनादरम्यान कोरोना संक्रमित प्राण्यांमार्फत निरोगी प्राण्यांमध्ये कोरोना पसरला नाही. जर कोरोना संक्रमित रुग्णांना हे औषध दिलं तर 24 तासांतच त्यांच्या शरीरातील कोरोनाव्हायरसचा नाश होऊ शकतो.

वैभव फरतडे-मुंबई प्रतिनिधी✍

कोरोनावर उपचारासाठी तोंडावाटे घेतलं जाणारं हे पहिलं औषध आहे. हे औषध कोरोनावरील उपचारात गेम चेंजर ठरू शकतं. हे औषध तोंडावाटे घेतलं जाणारं आहे, त्यामुळे त्याचे तिप्पट फायदे होतात. रुग्णाच्या लक्षणांनुसार औषधाचा वापर केला जाऊ शकतो, असं प्लेंपर म्हणाले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

हे औषध प्रभावी ठरल्यास कोरोना मुक्तीसाठी मैलाचा दगड ठरु शकते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts