loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवसाच्या विजपुवरठ्यावरुन महावितरण चा यु टर्न ,पुन्हा रात्र पाळी सुरु! मनसेचा आंदोलनाचा इशारा

दिवसाच्या विजपुवरठ्यावरुन महावितरणे यु टर्न घेतला असुन पुन्हा रात्र पाळी सुरु केल्याने मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा तालुक्यात रात्रीचे वेळी शेतीपिकांना पाणी देताना कल्याण फुंदे या तरुण शेतकऱ्याचा बिबट्याने बळी घेतल्यानंतर दिवसा विजपुवरठा कराव आशी मागणी सर्व स्तरावरुण करण्यात आली होती त्यानुसार तहसीलदार व महावितरणकडून पाठपुरवा करुन दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु चारच दिवसात महावितरणकडून पुन्हा रात्रपाळीस विजपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

____________________________________ महावितरणतर्फे स्पष्टीकरण दिले जात आसले तरी रात्री पण पुर्ण दाबाने विज पुरवठा होत नाही ,बिबट्याचा बंदोबस्त होई पर्यंत दिवसा पुर्ण दाबाने विज उपलब्ध करुन द्यावी (धनंजय ढेरे-शेतकरी देवळाली) ___________________________________

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

अजुनही नरभक्षक बिबट्यास पकडण्यात आथवा मारण्यात वनविभागाला यश आलेले नाही बिबट्याचा धोका आसताना महावितरणकडून पुन्हा रात्रपाळीची विज दिली जात आहे हे अत्यंत चुकीचे आहे .बिबट्याचा बंदोबस्त होईपर्यंततरी शेतकऱ्याला दिवसा पुर्ण दाबाने विजपुवरठा करावा अन्यथा महावितरण च्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करु असा इशाराच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय बापु घोलप यांनी दिला आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

________________________________ दिवसा वीज उपलब्ध करुण देण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न करण्यात आला मात्र एकाच वेळी सर्व सबस्टेशन वरून दिवसा वीज पुरवठा करणे शक्य नाही कारण एका सबस्टेशन वर तिन तिन फिर आहेत त्या मुळे पूर्ण दाबाने विजपुरवठा होत नाही ,व रोहीत्र ,विदुत पंप जळण्याचा धोकि होवु शकतो .दिवसा वीज देयची झाल्यास आठ तासा ऐवजी चार तास वीज पुरवठा करावा लागेल (शाखा उपअभियंता जेऊर)

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts