loader
Breaking News
Breaking News
Foto

बिबट्या चा मोर्चा पुर्व भागात? ,सालसे शिवारात एक जण हल्ल्यातून बचावला ,वनविभागाचे लोक ठसे घेण्यासाठी रवाना!

करमाळा तालुक्यात बिबट्याने थैमान घातले असुन नेमकी बिबट्याची संख्या किती आहे याचा नेमका आकडा वनविभागाला देखील सांगता येत नाही

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आज हिवरे सालसे रोडवरील सालसे हद्दीतील राम जगन्नाथ काळे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे त्यांनी स्वतःसा चौफेर च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले आहे

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

आज रात्री पावने नऊच्या सुमारास घरासमोरील शेतात वैरण काढत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला परंतु अंगात असलेल्या जर्कींग मुळे बिबट्याला पकड घेता आला नाही,काळे यांच्या हतात असलेल्या कोयता देखील काळे यांनी बिबट्यावर भिरकवला पंरतु तो बिबट्याला लागला का नाही हे नक्की सांगता येत नाही ,मोठ्याने ओरडल्याने बिबट्याने त्या ठिकाणाहून धुम ठोकली व राम काळे यांचा जिव वाचला आहे बिबट्याचे ठसे घेण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी सालसे कडे रवाना झाले असल्याचे समजते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

काळे यांच्यावर हल्ला केलेला बिबट्या हा चिखलठाण परिसरातुनच आला आहे का? तो खरेच नरभक्षक होता का? हे आताच सांगता येत नाही . मात्र नागरिकांनी सतर्क रहाणे गरजेचे आहे हिवरे येथे देखील बिबट्या दिसल्याची चर्चा आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts