शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी महिला कांग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्षा तृप्तीताई साखरे यांनी केले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून राज्यात 'शरद पवार ग्रामसमृद्धी योजना' राबविण्याचा महत्त्वाचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या पार्श्वभूमीवर त्या सा चौफेर शी बोलत होत्या .
. या योजनेच्या माध्यमातून ग्रामविकासाचे तसेच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. 'मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध' हे ध्येय गाठण्यासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना या 'शरद पवार ग्रामसमृद्धी योजने'च्या अनुषंगाने राबवण्यात येणार आहेत. प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हशींसाठी पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग या चार वैयक्तिक कामांना योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्याला वैयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन त्याद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील जेणेकरून कामाअभावी होणारे स्थलांतर थांबविण्यास मदत होईल असे ही साखरे यांनी स्पष्ट केले.
योजनेची वैशिष्ट्ये - गाय आणि म्हैस यांच्या एका गोठ्यासाठी ७७ हजार १८८ रुपये खर्च येईल. यासाठी ६ गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे याकरिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट तसेच १८ गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील. - शेळीपालन शेड बांधणे- किमान २ शेळ्या असलेल्या भूमीहीन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेला लाभ देता येऊ शकेल. एका शेडसाठी ४९ हजार २८४ रुपये खर्च येतो. हे शेड सिमेंट व विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येईल. एका कुटुंबास जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता ३ पट अनुदान मंजुर करण्यात येईल. - कुक्कुटपालन शेड बांधणे- कुक्कुटपालनामध्ये प्रत्येक शेडला ४९ हजार ७६० रुपये खर्च अपेक्षित आहे. १०० पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थींनी पक्षांची संख्या १५० च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल.भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग- जमिनीचा कस सुधारण्यासाठी शेतात एक नाडे बांधण्यासाठी ही योजना आहे. या नाडेपमध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, शेणमाती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात. २ ते ३ महिन्यात काळपट तपकीरी भुसभुसीत, मऊ, दुर्गंधी विरहित कंपोस्ट तयार होते. या नाडेपच्या बांधकामासाठी १० हजार ५३७ रुपये खर्च अपेक्षित आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.