loader
Breaking News
Breaking News
Foto

संगोबा बंधाऱ्याची गळती थांबावा अन्यथा ---- संजय (बापु) घोलप

करमाळा येथील बोरगाव संगोबा या ठिकाणच्या बंधाऱ्याची पाणी गळती तात्काळ थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय बापु घोलप यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

बोरगाव, दिलमेश्वर ,आळजापुर खांबेवाडी,निलज,तरडगाव बाळेवाडी येथील शेतकऱ्यांनी मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवावा आशी मागणी केली आसता घोलप यांनी तात्काळ पाटबंधारे विभागाचे अधीकारी कुलकर्णी साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ पाणी गळती थांबवावी आशी मागणी केली आहे

मनसे च्या मागणीची प्रशासनाने घेतली तात्काळ दखल

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

वेळी अधीक बोलताना घोलप म्हाणाले की सलग तीन वर्ष दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्याना या वर्षी सिना नदी वाहील्याने दिलासा मिळाला आहे बंधाऱ्याच्या या आडवुन ठेवलेल्या पाण्यावर,आळजापुर,पोथरे,निलज,बाळेवाडी,बोरगाव,संगोबा ,धायखींडी ,तरडगाव यासह आसपाची चाळीस गावे पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत मात्र पाणी गळती होत राहील्यास लवकरच बंधारा कोरडा पडुन शेतकऱ्यांवर पाणीटंचाई चा प्रश्न निर्माण होऊ शकेल त्यामुळे तात्काळ पाणी गळती न थांबवील्यास मनसे स्टाईल अंदोलन करु आसा इशारा मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

संगोबा बंधाऱ्याची आम्ही पहाणी केली आहे काही दरवाजे वाकल्याने पाणी गळती होत आहे येत्या तीन दिवसांत हि पाणी गळती पुर्ण पणे बंद करु- श्री कुलकर्णी साहेब पाटबंधारे विभाग

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts