तानाजी सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्या नंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास संपादन केला होता, अत्यंत कठीण आशा यवतमाळ विधान परिषद मतदार संघातून दणदणीत विजय मिळवून सावंत यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मर्जी संपादीत केली होती. बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना ,दुष्काळाच्या काळात परांडा तालुक्यात राबवलेले शिवजलक्रंती अभियान या मुळे मराठवाडय़ात शिवसेनाचा नावलौकिक चांगलाच वाढला होता त्यामुळे सावंत आल्पवधीतच ठाकरे यांच्या गळ्यातील ताईत बनले होते, उपनेते,आमदार ते थेट जलसंधारण मंत्री आसा त्यांचा शिवसेनेतील वेगवान प्रवास ठरला होता .आर्थात हा प्रवास अनेकांच्या डोळ्यात खुपत होता खास करुण मुंबईतील अनेक बडे नेते सावंत यांच्यावर आतुन जळत होते. सावंत याचा उपहासाने "लक्ष्मीपुत्र "आसा उल्लेख करत होते.
जलसंधारण मंत्री पदाबरोबरच सोलापूर जिल्हा सह-पालकमंत्री सोलापूर व धाराशीव जिल्हा संपर्कप्रमुख पदावर सावंत यांची वर्णी लागली ,त्या नंतर सावंत यांनी दोन्ही जिल्हयाची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली व नंतर शिवसेनेत संघटनात्मक बदलाचा धडाका लावला ,धनंजय डिकोळे ,पुरुषोत्तम बरडे यांचे पंख छाटले गेले व सोलापूरात गणेश वानकर पंढरपूर ला संभाजी शिंदे यांना बळ दिले . पंढरपुर येथील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा "न भुतो ना भविष्यती" ठरल्यानंतर सावंत यांनी विधान सभेसाठी मोर्चे बांधणी केली बार्शी येथुन दिलीप सोपल,सोलापूर येथुन दिलीप माने,करमाळा येथुन रश्मी बागल यांचा प्रवेश करुन घेतला व ताकद पणाला लावून उमेदवारी देखील मिळवुन दिली . सावंत यांच्या इथपर्यंतचे डावपेच यशस्वी ठरले.
सावंत यांच्या भेटी नंतर मात्र सोलापूर जिल्ह्यातील सावंत विरोधक सावध झाले असुन सावंत समर्थकात उत्साह दिसत आहे ,पक्ष सावंत यांच्या कडील जबाबदारी कायम ठेवणार का या कडे आता सर्वाचे लक्ष लागून राहीले आहे
विधान सभा निवडणुकीत नंतर मात्र सावंत यांचे पारडे फिरले ते स्वतः परांडा या राष्ट्रवादी च्या बालेकिल्ल्यातुन प्रचंड मतिंनी विजयी झाले मात्र सावंत यांनी दिलेले सर्व उमेदवार सपाटून पराभुत झाले याला फक्त सांगोला मतदारसंघ अपवाद ठरला येथे कशी बशी सेनेची जागा लागली . उमेदवार पराभूत होवुन देखील सावंत यांचे पक्षातील स्थान मजबूत होते महाविकास आघाडीच्या बैठकीत व घडामोडींत ते हजर होते मंत्री पदासाठी त्याचे नाव देखील शेवटपर्यंत निश्चित होते मात्र शेवटच्या क्षणी सावंत याचा पत्ता कट झाला ,आपल्या मंत्री पदाला राष्ट्रवादीचे शरद पवार यांनीच कात्री लावली असा सावंत यांचा पक्का समज झाला व त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच जाब विचारला ,तसेच जोपर्यंत कारण समजत नाही तोपर्यंत मातोश्रीवर येणार नाही असे ते म्हणताच ठाकरे यांनी सावंत यांना "जय महाराष्ट्र"केला!. त्या नंतर मिडिया व वृत्तपत्रील उलट सुलट चर्चेचा आधार घेत सावंत यांना खलनायक ठरवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सावंत विरोधी गट सक्रीय झाला या गटाला मुंबतील काही नेत्यांचे पाटबळ मिळाले" खेकड्याने पक्ष पोखरला" आसे फलक सोलापूरात झळकले, त्या नंतर पुन्हा पुरुषोत्तम बरडे,धनंजय डिकोळे यांना पदे बहाल करण्यात आली सावंत समर्थक लक्ष्मीकांत ठोंगे यांची हाकालप्टी केली पंढरपूर विभागाचे संभाजी शिंदे यांना देखील हटवण्यात आले होते, मात्र पुन्हा दोन तालुक्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली यादरम्यान सावंत यांचेकडे असलेले संपर्कप्रमुख पद देखील आहे की नाही पक्षाने जाहीर केले नाही,पक्षाने सावंत विरोधाकांना बळ दिले तरी सावंत यांच्यावर कारवाई केली नव्हती ,सावंत देखील पक्षाबरोबर फारकत ठेवून आसले तरी पक्ष सोडण्याचा कोणताही प्रयोग केला नव्हाता अखेर सरकार स्थापन झाल्यापासून एक वर्ष भर पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे यांना न भेटलेले सावंत यांनी मतदारसंघातील विकासकामांच्या निमित्ताने ठाकरे यांची भेट घेत दुरावा दुर करण्याचा प्रयत्न केला आहे आज सोशेल मिडियावर पोस्ट टाकुन ठाकरे यांचे भेटीबाबत खालील खुलासा केला आहे
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.