बीड व नगर जिल्ह्यात हैदोस घातलेल्या नरभक्षक बिबट्याची करमाळ्यात दहशत आठ दिवसानंतरही कायम आहे त्या मुळे नरभक्षक बिबट्याचा गेम कधी वाजणार असा सवाल आता विचारला जात आहे
करमाळा तालुक्यात तीन जणांचा बळी घेतलेला बिबट्या हा नरभक्षक असून याच बिबट्याने औरंगाबाद, अहमदनगर, बीड जिल्ह्यात सहा जणांचे बळी घेतल्याचे सिध्द झाले असून बीड जिल्ह्यात वॉन्टेड असलेला हा नरभक्षक बिबट्या करमाळा तालुक्यातही तीन जणांचे बळी घेवुन वॉन्टेड बनला आहे. बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. वनविभाग, पोलीस प्रशासन व विशेष शार्प शुटर पथकाच्या निशाण्यावर हा बिबट्या असून बिबट्याचा गेम कधी वाजणार ? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
१ डिसेंबर पासून नरभक्षक बिबट्याची करमाळा तालुक्यात चाहूल लागली. खडकी परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू असतानाच ३ डिसेंबर रोजी लिंबेवाडी येथील शेतामध्ये ज्वारीच्या पिकाला पाणी देत असलेले तरूण शेतकरी कल्याण कुंदे (वय-४०) यांच्यावर हल्ला करून बिबट्याने त्यांचे शिर धडा वेगळे केले. त्यानंतर एक दिवस विश्रांती घेऊन अंजनडोह येथे लिंबोणीच्या बागेत कामकरत असलेल्या जयश्री शिंदे (वय-२५) या विवाहित महिलेचा बिबट्याने बळी घेतला. लिंबेवाडी ते अंजनडोह व नंतर चिखलठाण असा प्रवास करत दोन दिवस विश्रांती घेत बरोबर ७ डिसेंबरला चिखलठाण येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या शेतात उसतोड सुरू असताना शेजारी खेळत असलेल्या फुलाबाई कोटली या नऊ वर्षाच्या ऊसतोड कामगाराच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. ऊसतोड कामगारांनी प्रतिकार केल्यानंतर मुलीला सोडून बिबट्याने धुम ठोकली, परंतु दुर्दैवाने मुलीचा जीव वाचला नाही.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.