loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकर्‍यांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनास हमाल पंचायतचा पाठिंबा- ॲड.राहुल सावंत

शेतकरी बांधव तसेच विविध शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या उद्याच्या भारत बंद आंदोलनास हमाल पंचायत च्या वतीने जाहीर पाठिंबा असल्याचे करमाळा तालुका हमाल पंचायत चे अध्यक्ष ऍड .राहुल सावंत यांनी सा चौफेर शी बोलताना सांगीतले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

अधिक बोलताना सावंत म्हणाले की उद्या आठ डिसेंबर २०२० रोजीच्या देशव्यापी शेतकऱ्यांच्या बंदच्या निमित्ताने करमाळा बाजार समिती आवारातील मार्केट यार्ड व शहरातील किराणा व्यापारी असोसिएशन मधील हमाल स्टॉफ, कामगार युनियन, करमाळा तालुका हमाल पंचायत, करमाळा ही संघटना शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याकरिता बंद मध्ये सहभागी होत आहे . कारण ते ज्या प्रश्नासाठी गेले तीन महिने रस्याबरवर बसून आहेत ते सर्व प्रश्न आमचे आहेत म्हणून त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून निदर्शेने करुन सरकारला निवेदन देण्यात येणार आहे.

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

शेतकरी आंदोलनाच्या शेतकरी विरोधी, कृषी व कामगार विरोधी श्रमसंहिता हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी तसेच केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याबाबत उद्या सकाळी ११ वाजता बाजार समिती मुख्य कार्यालय, करमाळा याठिकाणी आदरणीय कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या आदेशानुसार हमाल पंचायतीचे अध्यक्ष ॲड.राहुल सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ निदर्शने करुन बाजार समितीचे प्रशासक यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, खा. शरदचंद्रजी पवार माजी कृषिमंत्री, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

अशी माहिती हमाल पंचायतीचे अध्यक्ष ॲड.राहुल सावंत यांनी यावेळी दिली.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts