loader
Breaking News
Breaking News
Foto

शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलठाण येथे रक्तदान शिबीरचे आयोजन,रक्तदान करण्याचे चंद्रकांत सरडे यांचे आवहान!

देशाचे नेते माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या १२ डिसेंबर रोजी असणाऱ्या ऐंशी व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिखलठाण येथे दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले असल्याची माहिती चिखलठाणचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक चंद्रकांत (काका) सरडे यांनी सा.चौफेर शी बोलताने दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम अटींचे पालन करुन हे शिबीर होणार असल्याचेही सरडे यांनी अधोरेखित केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारे युवक आणि नागरिक यांच्या संकल्पनेतून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असुन संपूर्ण तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षावर आणि पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी जास्तीत जास्त रक्तदान करून सहकार्य करावे असे आव्हान सरपदच चंद्रकांत (काका )सरडे आणि चिखलठाण येथील राष्ट्रवादी प्रेमी यांनी केले आहे.

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

इच्छुकांनी आपली नाव नोंदणी अनिकेत राखुंडे तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस करमाळा मोबाईल क्रमांक7219070759 या क्रमांकावर नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी उपसरपंच दादासाहेब सरडे,माजी उपसरपंच राजाराम मराळ घाडगे भाऊसाहेब,व सर्व सदस्य उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts