loader
Breaking News
Breaking News
Foto

नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शुट ची ऑर्डर देऊन तात्काळ खासगी शार्पशुटरला पाचारण करा- शाहुराव फरतडे

नरभक्षक बिबट्याच्या तावडीतून निरपराध लोकांचा जिव वाचवणायासाठी तात्काळ बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्यावेत व नरभक्षक अवनी वाघीण एन्काऊंटर पॅटर्न वापरुन तज्ञ व अनुभवी शार्प शुटरची नेमणूक करुण बिबट्याचा फडशा पाडावा आशी आग्रही व मह्त्वपूर्ण मागणी शिवसेना माजी तालुकाप्रमुख व सा करमाळा चौफेर चे संपादक शाहुदादा फरतडे यांनी केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी अधीक बोलताना फरतडे म्हणाले आहेत की नरभक्षक झालेला वाघ किंवा बिबट्या यास मानवी रक्ताची चटक लागल्याने तो वारवंवार माणसांवरच हल्ले करतो हा आजपर्यंत चा इतिहास आहे यवतमाळ जिल्ह्य़ातील नरभक्षक वाघीणीने तब्बल तेरा जणांचा बळी घेतला होता परंतु त्या वाघीणी सोबत बछडे असल्याने जंगल परिसरातील जवळच्या शेतकऱ्यांवरच हल्ला करत होती, वाघीणिचा बंदोबस्त करण्यात वनविभाग हतबल झाल्यावर खासगी शार्प शुटर शफात अली यांना पाचारण करावे लागले होते.

चौफेर प्रतिनिधी ✍

करमाळा तालुक्यात देखील तिच परस्थिती आहे गेल्या सहा दिवसापासुन वन विभागाचे शकडो कर्मचारी, पोलीस, महसुल प्राशसान सर्व जण डोळ्यात तेल घालून गस्त घालत आसले तरी बिबट्यांच्या ठशा शिवाय यांच्या हाती काही लागले नाही, यांना बिबट्या दिसण्यापुर्वीच दोन जणांचा बळी गेला आहे,अनेक गावात लोकांना मात्र बिबटे दिसत आहेत त्यामुळे प्रमाणीक काम करुन देखील प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे रहात आहे.त्यामुळे बिबट्याचा माग काढुन शिकार करणाऱ्यांना वेळेतच पाचारण करणे गरजेचे असल्याचे देखील फरतडे यांनी सांगितले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आष्टी व करमाळा तालुक्यातील चार जणांचा बळी घेणारा हा एकच बिबट्या आसावा अंदाज व्यक्त होत आहे कारण करमाळा तालुक्यात बिबट्या आल्या पासुन आष्टी ,कर्जत या भागात बिबट्यांचे हल्ले कमी झाले आहेत. हा नरभक्षक बिबट्या आणखी लोकांचे जिव घेवु शकतो त्यामुळे तात्काळ पाउले उचलणे गरजेचे आहे आजी माजी लोकप्रतिनिधींसह सर्व नेतेमंडळीनी एकत्रीत एवुन नरभक्षक बिबट्यास शुट करण्याची ऑर्डर काढण्यासाठी प्रशासावर दबाव आणणे गरजेचे आहे तरच लोकांचे प्राण वाचु शकतात अन्यथा मानवी रक्ताची चटक लागलेला हा नरभक्षक बिबट्या अनेक निरपराध लोकांचे जिव घेवु शकतो अशी भिती देखील फरतडे यांनी व्यक्त केली आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts