loader
Breaking News
Breaking News
Foto

माणसं मारणारा नरभक्षक बिबट्या सरकारचा जावाई आहे का?

आष्टी तालुक्यात दोघांचा फडशा पाडल्यानंतर तो नरभक्षक बिबट्या करमाळा तालुक्यात धुमाकुळ घालतोय एका दिवसाच्या फरकात एका पुरुष व महिला शेतकऱ्याचा जिव या बिबट्याने घेतला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

माणसाच्या रक्ताची चटक लागलेला हा बिबट्या आणखी किती जणांचा जिव घेणार हे सांगता येत नाही. आनेक ठिकाणी बिबट्या पाहिल्याचा दावा होत आहे सर्वच अफवा आहेत समजुन दुर्लक्ष करणे देखील अवघड आहे ,कारण उमरड मध्ये बिबट्या दिसताच महिलेची बोबडी वळली असुन ति बेशुद्ध पडली असल्याची माहिती समोर येत आहे तसेच करमाळा शहरालगत असलेल्या मुथा नगर येथील पांजरपोळ तलाववर बिबट्या पाणी पिऊन गेला आहे अशी माहीती आहे.

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

कुगाव मांजरगाव परिसरात काही जनावरांवर देखील हल्ले झाले आहेत त्यामुळे बिबट्याची संख्या नेमकी किती आहे व कोठुन आले आहेत या बाबत वनविभाग देखील ठामपणे माहिती सांगु शकत नाही. सध्या या बिबट्याला मानवी रक्ताची चटक लागली आहे एका पाठोपाठ एक असा दोघांचा फडशा या नरभक्षक बिबट्याने पाडला आहे वनविभागाने लावल्या पिंजर्‍याला हुल देवुन बिबट्याचा धुडगूस सुरु आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

बिबट्याचा धुडगूस सुरु असताना माझ्या फोन मुळे शुट करण्याची ऑर्डर येणार , का? तुझ्या फोन मुळे येणार ?यातच नेतेमंडळीची दमछाक सुरु आहे ,फोनाफोनी सोडा व लोकांचे जिव वाचवण्यासाठी एकत्र ऐवुन ठोस भुमीका घ्या असा जनतेतुन सुर उमटत आहे,सर्व नेतेमंडळी वरिष्ठ पातळीवर फोना फोनी केली आहे तरी देखील सरकार,वनविभाग, बिबट्याला गोळ्या घालण्याची ऑर्डर का काढत नाही?आणखी माणसं मरायची सरकार व प्रशासन वाट बघतय का? का माणसं मारणारा नरभक्षक बिबट्या सरकारचा जावाई आहे असा संतप्त सवाल आता जनतेतुन विचारला जात आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts