loader
Breaking News
Breaking News
Foto

कोणत्याही क्षणी येणार बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश!

आष्टी तालुक्यात धुमाकुळ बिबट्याने करमाळा तालुक्यात हैदोस घातला असुन लिंबेवाडी येथील एक पुरुष शेतकरी तर अंजनडोह येथील एका महिलेचा बळी घेतला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

अंजनडोह येथील महिलेचा चार ते पाच बिबट्यानी झाडावर नेवुन फडशा पाडल्याची चर्चा आहे तर विट ,झरे, खडकी,गुळसडी भागात अनेकांनी बिबट्या पाहिला आहे,कुगाव येथे देखील एका रेडकाचा फडशा पाडला असुन शिकार करण्याच्या पद्धतीवरुन रेडकावरील हल्ला देखील बिबट्याचाच असल्याचे बोलले जात आहे.

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

बिबट्याच्या हल्यात दोन दिवसात दोन बळी गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे . या पार्श्वभूमीवर आ संजयमामा शिंदे यांनी जोरदार हलचाली सुरु केल्या असुन वनपरिक्षेत्र अधीकारी धैर्यशील पाटील यांच्या बरोबर चर्चा केली असुन वरिष्ठ पातळीवरून सकाळ पर्यंत शुट ची ऑर्डर देण्याची मागणी केली आहे.तसेच डिवाय एस पी विशाल हिरे,पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे ,तहसीलदार समिर माने यांना रात्रभर गाड्यांच्या प्रकाशझोतात सर्चींग ऑपरेशन करुन बिबट्याचा ठावठिकाणा शोधण्याच्या सक्त सुचना केल्या आहेत

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याची ऑर्डर मिळाली तरी सध्याच्या वातावरणा वरुन बिबट्याची संख्या जास्त असावी आसा आंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे जास्तीची कुमक मागवुन सर्व बिबट्यांना दिसता क्षणी गोळ्या घालाव्यात व तालुक्यातील निरपराध लोकांचे संरक्षण करावे अशी मागणी तालुक्यातुन होत आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts