loader
Breaking News
Breaking News
Foto

रात्री च्या वेळी शेताला पाणी देताना बिबट्याचा हल्ला झाल्यास महावितरण ला जबाबदार धरू- तुप्ती साखरे

रात्री पाणी देताना बिबट्याचा हल्ला झाल्यास महावितरण ला जबाबदार धरू असा इशारा तुप्ती साखरे यांनी दिला आहे मागील काही दिवसांपासून आष्टी-कर्जत-जामखेड-करमाळा या भागात बिबट्याने प्रचंड दहशत माजवली आहे.या भागात बागायती क्षेत्र असल्याने शेतकरी वर्गाला रात्री अपरात्री शेताला पाणी द्यायला जावे लागते. काल करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी(लिंबेवाडी) चे कल्याण फुंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तालुक्यात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.अशाच प्रकारे जिंती भिलारवाडी कात्रज हा भाग ऊस पट्टयाचा असल्याने शेतकरी वर्गाला रात्री वीज पुरवठा होत असल्याने रात्री-अपरात्री शेतीत जाऊन शेतीची कामे करावी लागतात. फुंदेवाडी इथे जो दुर्दैवी प्रकार झाला तो या भागात घडू नये यासाठी वनविभागाने लवकरात लवकर त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पाऊले उचलावीत,तसेच महावितरण विभागाने शेतीसाठी रात्री ऐवजी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी अन्यथा या पुढे शेतीला पाणी देताना बिबट्याचा हल्ला होवुन जिवीतहानी झाल्यास महावितरण व ला जबाबदार धरले जाईल असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष तृप्ती साखरे सा चौफेर शी बोलताना महावितरणाला दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

फुंदेवाडी झालेल्या प्रकाराने तालुक्यातील शेतकरी,गावकरी दहशतीखाली वावरत आहेत.त्यामुळे वनविभागाने या बिबट्याला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी आता तालुक्यातील विविध भागातून होत आहे.

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

सदर विषयाला अनुसरून आजच वनविभागाच्या अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्या बिबट्याला सापळा रचून पकडण्याचे आश्वासन दिले आहे.याबाबतीत लवकरात लवकर कार्यवाही नाही झाल्यास हा विषय वनमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.दत्तात्रय भरणे यांच्या समोर मांडणार असल्याचा इशारा देखील तृप्ती साखरे यांनी दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सध्या बिबट्या ने धुमाकूळ घातल्याने शेतकरी दहशती खाली वावरत आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts