बिबट्या जेरबंद होईपर्यंत दिवसा विजपुरवठा करावा अशी आग्रही व मह्त्वपूर्ण मागणी मनसे तालुकाध्यक्ष संजयबापु घोलप यांनी सा.चौफेर शी बोलताना केली असुन संबंधित विभागांना निवेदन देखील दिले आहे. गुरुवारी लिंबेवाडी फुंदेवाडी येथील शेतकऱ्याला ज्वारीला पाणी घालण्यासाठी गेल्यानंतर शेतीमध्ये दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवत गंभीर जखमी करून ठार केले. यापूर्वीही तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी तसेच शेजारील जामखेड, कर्जत तालुक्यात बिबट्याने थैमान घातलेले असताना ही करमाळा तालुक्यात अपेक्षित अशी काळजी घेताना वन विभाग दिसले नाही. तर आजही गावोगावी भितीचे वातावरण असल्याने नागरीक दहशतीखाली जगत आहेत.
गुरुवारी झालेल्या हल्ल्यानंतर लिंबेवाडी परिसरात तसेच कर्जत, राशीन, करमाळा जामखेड या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी रात्री-अपरात्री वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीमध्ये पाणी देण्यासाठी रात्रीच जावे लागते. त्यावेळी पुन्हा एकदा अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे हल्ले होण्याची शक्यता आहे.
रात्री वीज पुरवठा होत असल्याने रात्री-अपरात्री शेतकऱ्यांच्या शेतीत जाऊन शेतीची कामे करावी लागतात. तर ही वीज रात्री न देता दिवसा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतीकडे जावे लागणार नाही. तर लवकरात लवकर सापळा रचून संबंधित बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष संजय बापू घोलप यांनी केली आहे.
तरी जोपर्यंत संबंधित बिबट्या किंवा जंगली हिंस्त्र प्राणी पकडला जात नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांना रात्रीच्या वीज पुरवठ्या ऐवजी दिवसाचा वीजपुरवठा करावा जेणेकरून शेतकरी दिवसा शेतीची सर्व कामे आटपून आपल्या घरी परत येईल. त्यामुळे जीवितहानी होण्यास बचाव करता येईल.असे ही घोलप यांनी निवेदनात म्हटले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.