loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाकरे सरकार घेणार हा ऐतिहासिक निर्णय

राज्यात असंख्य ठिकाणी लोक वस्त्यांना जातींवरून नाव देण्यात आलेली आहेत. जातीची ही ओळख पुसून काढण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यामुळे अशा वस्त्यांना असलेली जातींची नावे हद्दपार होणार आहेत. यासाठी सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच त्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळू शकते. राज्यात अनेक ठिकाणी कुंभार मोहोल्ला, तेलीपुरा, बारीपुरा, चांभारपुरा, ब्राह्मण आळी, सुतार गल्ली, परिट आळी, गवळ आळी, गवळी कोंड इत्यादी नावे वस्त्यांना देण्यात आली आहेत. जातीच्या या खुणा पुसून टाकण्याऐवजी वर्षानुवर्ष त्या जपल्या जात आहेत. विशेष म्हणजे एकविसाव्या शतकात या वस्त्यांची सरकारी रेकॉर्डवरील नोंदही तशीच आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यामुळे समाजात एकीची भावना निर्माण होण्यास अडथळा येत आहे. मात्र या निर्णयामुळे आता हा वेगळेपणा कायमचा बंद होऊन एकीची भावना वाढणार आहे.

वैभव फरतडे-मुंबई प्रतिनिधी✍

वस्त्यांना महापुरुषांची नावे देणार वस्त्यांना दिलेली जातिवाचक नावे योग्य नाहीत असे मत काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले होते. पवार यांच्या या मताचा विचार करून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार त्या संबंधीचा प्रस्ताव विभागाने तयार केला आहे. जातिवाचक नावांमुळे त्या वस्त्या विशिष्ट समाजाच्या असल्याचे दिसते. आता या वस्त्यांना महापुरुषांची नावे दिली जातील. हा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना असणार आहे. नगरविकास आणि ग्राम विकास विभागातर्फे त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत. राजकारणात जातीचा वापर करण्यासाठी नेत्यांनीच या जाती ठळक करून ठेवल्याचा आरोप वर्षानुवर्षे होत असताना महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनीच ही रेषा पुसण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts