साखर सम्राटांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पदवीधर मतदारसंघाचा सर्वपक्षीयाकडुन वापर होत असल्याचा घणाघात पुणे पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रा शिवाजीराव बंडगर यांनी सा.चौफेर शी बोलताना केला आहे
हजारो पदवीधर युवक युवतीं बेरोजगारी च्या समस्येशी झगडत आहेत . बेरोजगार भत्त्याचे पत्ता नाही . उद्योग धंदे उभे करण्यासाठी शासनाचे कसलेही सहकार्य नाही. तासिका तत्वावरील पदवीधरांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते . या सारख्या समस्यांना पदवीधर तोंड देत असताना या मतदार संघातून निवडून गेलेल्या आतापर्यंतच्या आमदारांनी या बाबतीत कोणतेही काम केले नसून पदवीधर व शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. विधानपरिषदेत पदवीधरांच्या प्रश्नावर कधी तोंड उघडले नाही . त्यामुळे पदवीधर कायम वार्यावर च राहिले . पक्षीय राजकारणाच्या गर्तेत खोलवर गुंतलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडी तसेच भाजपने दिलेले उमेदवार साखर कारखानदार आहेत . या साखर सम्राटांचे पुनर्वसन करण्यासाठी याना या मतदारसंघात उभे केल्याने मतदारात प्रचंड निरुत्साह आहे.पदवीधर मतदारसंघाचा वापर साखर सम्राटांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठीच येत असल्याची जाणीव मतदरांना झाली असल्याने पदवीधर माझ्या पाठिशी ठाम पणे उभा राहतील असा विश्वास देखील बंडगर यांनी व्यक्त केला आहे.
कायदेमंडळात आपल्या प्रश्नांना वाचा आपण फोडू शकतो यावर पदवीधराना विश्वास बसत आहे .त्यामुळे आपल्या उमेदवारीस उस्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे बंडगर म्हणाले. निवडून गेल्यास आपण कायम विनाअनुदानीत तत्वावरील शिक्षण पद्धतीला विरोध करणार आहोत . तसेच जुनी पेन्शन योजना लागू करणे,आश्रमशाळेचे प्रश्न सोडविणे, नेट सेट धारकांचे प्रश्न सोडविणे, समान काम समान वेतन चा आग्रह धरणे, सेवा शर्ती नियमावली त सुधारणा करणे , उच्च माध्यमिक व्यवसायानंतर व्यवसाय शिक्षणातच व्हर्टीकल मोबॅलिटी मिळवून देणे ,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यास क्रमाचे रूपांतरणास विरोध करून या विभागाचे सक्षमीकरण करणे ,प्रत्येक तालुक्यात स्पर्धा मार्गदर्शन केंद्र उभारणे ,होस्टेल ची सोय करणे ,पदवीधर सन्मान योजना राबविणे, पदवीधरांच्या रोजगार निर्मिती वर भर देणे ,तात्काळ पोलीस, शिक्षक भरती सह अन्य रिकाम्या जागा भरणे, शिक्षण सेवक पद रद्द करून नेमणूक दिनांकापासून पगार देणे, सर्व शिक्षा अभियाना तील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे या शिवाय पदवीधरांच्या प्रश्नावर कायदेमंडळात आवाज उठवणार असल्याचे प्रा शिवाजीराव बंडगर यांनी सांगीतले प्रचाराच्या आघाडीवर बोलताना प्रा शिवाजीराव बंडगर म्हणाले की, पुणे विभाग पदवीधर मतदार संघ पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील 54 तालुक्यांचा असून कोकण,गोवा, कर्नाटक, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राची सीमा याला लागून आहे . प्रचाराची यंत्रणा राबविणे सर्वदूर जिकीरीचे असतानाही आम्ही टेकस्ट मेसेज, ऑडियो काॅलींग तसेच प्रत्यक्ष मतदाराना भ्रमणध्वनी वरून संपर्क करत असून चार लाख पंचवीस हजार मतदाराना आमची निवडणूक लढविण्या बाबतची भूमिका सांगत आहोत. असेही बंडगर यांनी स्पष्ट केले
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.