loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा महासंघांच्या तालुका प्रमुख पदी दिनेश घोलप तर शहर प्रमुख पदी संजय शिंदे.

करमाळा तालुका मराठा महासंघाची तालुका व शहर कार्यकारिणी सोलापूर जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी जाहीर केली असून करमाळा तालुक्याचे तालुका प्रमुख म्हणून दिनेश घोलप तर करमाळा शहर प्रमुख म्हणून संजय (नेते) शिंदे यांची निवड करण्यात आली आहे तर करमाळा ता सचिव म्हणून लक्ष्मण गुटाळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे मराठा समाजातिल गोरगरीब व होतकरू तरुणांना हाताला काम व समाजातील अडीअडचणी सोडवण्यासाठी ह्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे कै आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत समाजातील तरुण होतकरू सुशिक्षित बेकार तरुणांना कर्ज देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी यावेळी सांगीतले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या पदाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुण व होतकरू मुलांना हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नुतन तालुका प्रमुख दिनेश घोलप यांनी केले असुन,

या वेळी बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

मराठा समाजातील लोकांची सेवा करण्यासाची संधी मिळाली आहे हे मी स्वतः चे परंमभाग्य समजतो आज समाजातील तरुण पिढीला फक्त वापरून बाजूला केले जाते या वाट चुकलेल्या तरुण पिढीला पुन्हा समाजात मानाचे स्थान मिळाले पाहिजे असे काम करणार असल्याचे नुतन शहर प्रमुख संजय शिंदे यांनी सांगीतले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी मराठा महासंघाचे जिल्हा उपअध्यक्ष सचिन गंगथडे , जिल्हा सचिव गुरुदास गुटाळ पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष जाधव, सतिश धनवे, पुणे विभागिय संभाजी ब्रिगेडचे प्रमुख नितीन खटके, संभाजी ब्रिगेडचे सचिन काळे करमाळा अर्बन बँकेचे संचालक जितेंद्र चांदगुडे,कपिल यादव,कृष्णा फुटाणे,सागर पिसे,अमोल शिंदे,जयदीप शिंदे, लखन गायकवाड व ग्रामीण भागातील आबासाहेब पवार, भाऊसाहेब पवार,प्रवीण पवार,राजकुमार पडवळे, कानिफनाथ गुटाळ,अक्षय कुलकर्णी, राहुल धुमाळ हे उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts