loader
Breaking News
Breaking News
Foto

कोरोनाच्या लसीकरण साठी आशी आसणार यंत्रणा !

●मुंबई ● कोरोना ची लस उपलब्ध होण्या आगोदर एकाच वेळी जास्तीतजास्त लोकांना एकाच वेळी लस देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असुन देशात होणार्‍या मतदान प्रक्रिये प्रमाणे लसीकरण होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोरोना महासाथीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांनी काय उपाययोजना आखल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत लसीकरण मोहिमेवरही चर्चा झाली. त्यात कोरोना प्रतिबंधक लस देशात समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी मतदान केंद्राच्या धर्तीवर सर्वत्र लसीकरण केंद्रांची स्थापना केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. या बैठकीत कोरोना प्रतिबंधक लस

लसीकरण साठी आत्ता मतदान केंद्रावर मतदानासाठी सारख्याच रांगा लागण्याची शक्यता आहे.

वैभव फरतडे-मुंबई प्रतिनिधी

नेमकी कधी उपलब्ध होणार, याबाबत ठोस काहीही सांगण्यात आले नसले तरी लसीकरण मोहिमेसंदर्भात निती आयोगाचे सदस्य आणि कोरोना प्रतिबंध लस कृतीदलाचे प्रमुख डॉ.व्ही.के.पॉलयांनी एक सादरीकरण केले. निवडणुकीवेळी ज्याप्रमाणे मतदान केंद्रांची स्थापना केली जाते त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन केले जातील व या केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविली जाईल, असे पॉल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शीतकोठारांची साखळी अधिक मजबूत करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत. ही शीतकोठारे कोविन ॲपशी संलग्न करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

●ठळक मुद्दे● पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाईल आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीक- रणात प्राधान्य ●लसीकरण केंद्रांची गटनिहाय स्थापना सरकारी आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर लसीकरण मोहिमेची जबाबदारी ●मोहिमेशी संबंधित लोकांना प्रशिक्षित केले जाईल जनसहभाग वाढवण्यावर भर दिला जाईल ●लस येत नाही तोपर्यंत सर्वत्र कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याचे असे आदेश पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts