प्रताप सरनाईक बोलणार. प्रताप सरनाईकचं तोंड ईडीची धाड पडली म्हणून बंद होणार नाही. प्रताप सरनाईक बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे फाशी लागली तरी चुकीच्या गोष्टी सहन करणार नाही असा खणखणीत आत्मविश्वास शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलुन दाखवला.
[25/11, 17:14] Shambhuraje Phartade: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) छापे टाकण्यात आले. टॉप्स कंपनी समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सकाळी ८ वाजताच ईडीकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग यांना ताब्यात घेऊन पाच तास चौकशी करण्यात आली. दरम्यान ईडीच्या लोकांनी घरी आल्यानंतर नाष्टा आणि जेवण केल्याचा खुलासा प्रताप सरनाईकांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. "माझ्या तसंच मुलांच्या घरी, ऑफिसात गेल्यानंतर ईडीच्या लोकांनी मस्त नाश्ता केला. चार पाच वेळा चहा घेतला, जेवण केलं. एखाद्या घरात पाहुणे आल्यानंतर स्वागत कसं करायचं हे सरनाईक कुटुंबाला चांगलं माहिती आहे. माझी पत्नी, मुलं आणि सुनांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं, यथोच्छ पाहुणचार केला," अशी माहिती प्रताप सरनाईकांनी दिली आहे. "पण एक मात्र आहे ज्या दिवशी अर्णब गोस्वामी, कंगना रणौत यांच्यावर हक्कभंग दाखल केला. अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करायला लावला. त्याच दिवशी उद्या काय होणार याचा प्रताप सरनाईकने विचार केला होता. आम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलो आहोत. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंनी मला आमदार केलं. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या पक्षाची धोरणं, भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट करणं ही माझी जबाबदारी आहे," असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचं विचारत होते असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. "या देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. प्रताप सरनाईकचं तोंड ईडीची धाड पडली म्हणून बंद होणार नाही. या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे. मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलेलो नाही. जो अडकलेला नसतो तोच विरोधकांना अशा ठामपणे उत्तर देत असतो. भविष्यात असे अजून प्रसंग आले तरी समोर जाण्याची तयारी आहे," असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.