loader
Breaking News
Breaking News
Foto

सेना नेत्यांच्या मागे "ईडी " पिडा ?आ. प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापा

ठाणे: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) अधिकारी पोहोचले आहेत

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचं पथक दाखल झालं आहे. त्यांच्या कार्यालयांमध्येही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. सध्या प्रताप सरनाईक आणि त्यांचे दोन्ही पुत्र परदेशात आहेत. त्यांनीदेखील या माहितीला दुजोरीला दिला आहे. पण ईडी कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोहोचली आहे, याचा तपशील आपल्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितलं.

वैभव फरतडे-मुंबई प्रतिनिधी

आज सकाळी आठ-साठे आठच्या सुमारास ईडीची तीन पथकं तपासासाठी पोहोचली. त्यांनी आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे दोन पुत्र आणि त्यांच्या कार्यालयात तपास सुरू केला. ईडी नेमक्या कोणत्या प्रकरणात तपास करत आहे, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या सरनाईक पिता पुत्र देशाबाहेर असल्याचं समजतं. सरनाईक यांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना ईडीनं बोलावलं आहे. शिवसेनेच्या इतर काही नेत्यांनादेखील ईडीकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचं समजतं

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आ.प्रताप सरनाईक यांनी आर्णब गोस्वामी च्या चौकशी मागणी केली होती त्या नुसार गोस्वामी यांच्यावर कारवाई देखील झाली होती.त्यामुळे या प्रकरणाला राजकीय किनार असल्याची देखील चर्चा आहे.त्या मुळे आता सेना नेत्यांच्या मागे ईडी पिडा लागणार का अशी चर्चा आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts