loader
Breaking News
Breaking News
Foto

*मराठा उद्योजक लॉबीच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले .

साधारणतः तीन वर्षापुर्वी बोटावर मोजण्याइतक्या काही मराठा तरुण बांधवांनी मराठा आर्थिक दृष्टीने सक्षम व्हावा, उद्योग,व्यवसायात उतरावा ह्या उद्देशाने लावलेलं मराठा उद्योजक लॉबी नावाचं इवलसं रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय अस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्यावेळी मोजक्याच तरुणांनी लावलेले हे रोपटं आज बघता बघता यात लाखो मराठा बांधव "एकत्र तर सर्वत्र" हे ब्रीदवाक्य घेऊन एकमेकांना व्यावसायिक देवाणघेवाण, व्यावसायिक माहिती, खरेदी विक्री, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यावसायिक बांधवांच्या व्यवसायाच्या जाहिराती शेअर करत अशा एक ना अनेक क्षेत्रातील मराठा बांधवांना सहकार्य करू लागले आहेत. यातुन नवीन उद्योजक उभे राहिले, व्यापारात आले व ताकदीने परिपक्व देखील झाले. मराठा उद्योजक लॉबी अर्थातच MUL या फेसबुक वरील सोशल गृपमध्ये जवळपास पाच लाख व्यावसायिक तसेच इतर मराठा बांधव आणि भगिनी एकत्र येऊन लहान व्यवसाय मोठ्या उद्योगापर्यत नेऊन मजल मारत पुढे सरसावत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सदर मराठा उद्योजक लॉबीचा पहिला व्यावसायिक वर्धापनदिन १९नोव्हेंबर२०१८ मध्ये पुणे साजरा करून नाशिक येथे ठक्कर डोम ह्या ठिकाणी विविध उत्पादक व व्यावसायिक असे जवळपास दोनशे स्टॉल तसेच भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करून अनेक बांधवांनी व्यावसायिक भेटी घेऊन विश्वासार्ह वारी घडवुन आणली होती. त्यांनतर दुसरा वर्धापनदिन १९नोव्हेंबर२०१९ रोजी अहमदनगर येथेही जोरदार कार्यक्रम व स्टॉलच्या सोहळ्याने परिपूर्ण झाला. अनेक व्यावसायिक, सक्षम उद्योजक, प्रेरणामय व्यक्तींचा गौरव करून सन्मानचिन्ह देण्यात आले होते . मात्र ह्या वर्षांचा म्हणजे तिसरा वर्धापनदिन चा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने तसेच रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा करण्याचे मराठा उद्योजक लॉबीच्या टीम च्या वतीने ठरवण्यात आले होते, त्याच पार्श्वभूमीवर आज आज (दि.१९नोव्हेंबर) झोडगे येथे *मराठा उद्योजक लॉबीच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या* निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, सध्या चालू जगभरात थैमान घातलेल्या कोरोनो व्हायरस व साथीच्या आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे रक्तपेढी मधील रक्तसाठा कमी झाला असल्या कारणाने, तो रक्ताचा तुटवडा भरुन काढण्याच्या उद्देशाने सदर शिबिराचे आयोजन मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने करण्यात आले होते.. *मराठा उद्योजक लॉबी* आयोजित सदर शिबीरात अनेक रक्तदात्यांनी ह्या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान ही केले,

एकत्र तर सर्वत्र

वैभव फरतडे

शिबिराप्रसंगी, मा. विजय (बापू) देसाई, मा.बलाशेठ गवांदे(माजी उपसरपंच झोडगे), योगेश देसले(माजी ग्रा.पा. सदस्य) मुकेश गवांदे, नंदू पगारे, भूषण गोसावी, लुभान गुंजाळ, विजय शेवाळे, मराठा उद्योजक लॉबी सरचिटणीस - अमोल महाडिक तसेच चिंतेश्वर देवरे आदी उपस्थित होते. मराठा उद्योजक लॉबी भविष्यात नक्कीच चांगल्या व्यावसायिक वाटचालीत तरुणांना प्रेरणामय राहील यांत शंका नाही.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

19 नोव्हेंबर मराठा उद्योजक दिन

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts