गेट उघडण्या तयार पण ,एस-टी व्यतिरिक्त इतर वाहने आत येणार नाहीत याची हमी कोण घेणार?असा सवाल करमाळा बस आगाराच्या आगार प्रमुख अश्विनी किरगत यांनी सा चौफेर शी बोलताना केला आहे. कारण स्टॅण्ड मध्ये येणाऱ्या इतर गाड्यास दुर्दैवाने अपघात झाल्यास कोणाला जबाबदार धरणार असा सवाल देखील उपस्थित केला असुन ट्राफीक फक्त गेट बंद मुळेच नाही तर रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे देखील होत आहे. संबंधित विभागाने या कडे देखील लक्ष द्यावे असेही किरगत यांनी सांगीतले .
करमाळा बस आगाराचे गेट बंद असल्याने संगम चौकात ट्राफीक जाम होण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.करमाळा बस आगाराला समोर च्या बाजुने दोन प्रमुख प्रवेशद्वार आहेत परंतु संगम चौकात अरुंद जागा असल्याने एसटी चालकास वळन (टर्न ) घेण्यास मोठी कसरत करावी लागत आसल्याने व सतत ट्राफीक चा प्रश्न निर्माण होत असल्याने बस आगाराच्या उत्तर बाजुस विज महावितरण च्या शेजारी असलेली भिंत पाडुन त्या ठिकाणाहून शॉर्टकट मार्ग तयार करण्यात आला होता. परंतु या गेट मधुन अनेक अवैध वाहतूक करणाऱ्या जिप ,टेम्पो,पिकअप तसेच मोटार सायकली थेट बस स्टँड मधेच पार्किंग होवु लागल्याने सदर गेट करमाळा आगारा कढुन बंद केले होते. सदरचे गेट बंद असल्याने संगम चौकात पुन्हा एकदा ट्राफीक चा प्रश्न निर्माण झाला होता.ऐन दिवाळीत नागरीकंना त्रास सहन करावा लागत होता. आज भर रस्त्यात एसटी बंद पडल्याने सुमारे आर्धा तास ट्राफीक जाम झाले होते. सा करमाळा चौफेर च्या पेजवरुन लाईव्ह येत या प्रश्नावर लक्ष वेधले होते तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी देखील आगार प्रमुख अश्विनी किरगत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केल्यानंतर किरगत यांनी सकारात्मक भुमिका घेतली असुन गेट उघडण्यास तयार आहोत परंतु ,एस-टी व्यतिरिक्त इतर वाहने येणार नाहीत याची हमी कोण घेणार? तसेच रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणा बाबत देखील संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.
करमाळा बस आगार ,पोलीस प्रशासन, व नागरपालीका यांनी मध्यमार्ग काढत गेट संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा सदर चे गेट उघडावे अशी नागरिकांकडून मागणी होत आसताना आगार प्रमुख अश्विनी किरगत यांनी घेतलेल्या सकारात्मक भुमिकेमुळे मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप व सा चौफेर च्या पाठपुराव्यास यश आले असुन उद्या पासुन एस टी ची ये जा या गेट मधुन होवुन संगम चौकातील ट्राफिक चा प्रश्न सुटणार आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.