loader
Breaking News
Breaking News
Foto

शेलगाव येथे रक्तदान शिबीरास उत्तम प्रतिसाद तब्बल सत्तर जणांनी केले रक्तदान!

यात्रा म्हटले की गावात उत्साहाचे व भक्तिभावाचे वातावरण असते.या धार्मिक उत्सवाला सामाजिक कार्याची देखील किनार द्यावी या उद्देशातून गावातील सुशिक्षित युवकांमधुन रक्तदान शिबिर आयोजित करण्याची संकल्पना तयार झाली. याच संकल्पनेतुन श्रावण महिन्यात असणाऱ्या यात्रे निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करणेची प्रथा गावकऱ्यांनी सुरु केली ,परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा भरली नाही .त्यामुळे रक्तदान शिबिर घेता आले नाही. परंतु रक्तदान शिबिराची परंपरा खंडित होऊ नये , म्हणून गावातील तरुण मंडळींनी दीपावली चे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आज आयोजन केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

भगवंत ब्लड बँक बार्शी , पाणी फाउंडेशन टीम शेलगाव (क) व राजश्री शाहू शेतकरी बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे शेलगाव(क) येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे हे तिसरे वर्ष आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग वीर सर ,मा. उपसरपंच सचिन पाटील , ग्रामपंचायत सदस्य अशोक माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बहुसंख्येने रक्तदाते उपस्थित होते. रक्त संकलन करण्याचे काम भगवंत ब्लड बँकचे गणेश जगदाळे, प्रसाद जगदाळे , कल्याण गवळी व किरण कोथमिरे यांनी केले. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राजश्री शाहू शेतकरी बचत गटाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

या रक्तदान शिबीरास महिलांचा सहभाग लक्षणीय होता

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची नावे पुढील प्रमाणे १. किरण माधव वीर २. अशोक विनायक माने ३. विकास प्रभाकर वीर ४. अजितकुमार प्रभाकर काटुळे ५.गणेश चांगदेव माने ६. समाधान दादासाहेब सांगडे ७. गोकुळ बळीराम वीर ८. शिवाजी हनुमंत विर ९. नागेश दादा ढावरे १०. उदयसिंह विकास काटुळे ११. विठ्ठल प्रभाकर काटुळे १२. धोंडीराम बाळनाथ वीर १३. राजेंद्र काशिनाथ माने १४. मिलिंद रामचंद्र काटुळे १५. विलास हिराचंद्र वीर १६. राहुल सोपान कुकडे १७. मोहन संजय माने १८. निलेश भाऊराव ननवरे १९. प्रवीण बाळनाथ बनसोडे २०. सुरेश शिवाजी पवार २१. सचिन संजय वीर २२. अभय विकास काटुळे २३. सौ.स्वाती विकास वीर २४. सौ.वर्षा दादा माने २५. सौ. अर्चना आप्पा माने २६. दत्तात्रेय विठ्ठल कातुरे २७. अमोल उत्तम शिंदे २८. महादेव भानुदास वीर २९. वैभव पुरुषोत्तम वीर ३०. समाधान दत्तात्रय ननवरे ३१. सुहास संदिपान काळे ३२ प्रियंका नागनाथ माने ३३. वैभव रमेश शिंदे ३४. सुनील बाळनाथ वीर. ३५. सुनील आदिनाथ माने ३६. प्रकाश महादेव वीर ३७. बाळनाथ मुकिंदा कुकडे. ३८ अशोक प्रकाश पाटील ३९. आनंदराव जालिंदर वीर ४०. नागनाथ आदिनाथ माने ४१. गणेश कांतीलाल दास ४२. प्रकाश शंकर वीर ४३ चंद्रहास जगन्नाथ शिंदे ४४. रेवनाथ राजाराम शिंदे ४५. अरविंद सोमनाथ खरात ४६. महादेव भाऊसाहेब मोहिते ४७. संतोष उत्तम मोहिते ४८. गोविंद रामचंद्र चोपडे ४९. सुखदेव मनोहर वीर ५०. योगेश धनाजी वीर ५१. अमोल औदुंबर काटुळे ५२. धर्मराज गोपीनाथ शिंदे ५३. प्रशांत नानासाहेब वीर ५४. मोहम्मद यासीन सय्यद ५५. सुजित कांतीलाल वीर ५६. गणेश दिलीप वीर ५७. लहू उद्धव शिंदे ५८. नागनाथ सुरेश शिंदे ५९. गणेश एकनाथ शिंदे ६०. अजित भागवत शिंदे ६१. गणेश महादेव माने ६२. बाबा रमेश ढावरे ६३. जगदीश भाऊसाहेब वीर ६४. गणेश सिताराम शिंदे ६५. सौ.अर्चना गणेश दास ६६. शिवाजी भगवानराव काटुळे ६७. अशोक गौरव बनसोडे ६८. सुनील सुरेश सोनवणे ६९. सौ गंगा शिवाजी काटोल ७०. शिवशंकर मधुकर शिंदे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts