loader
Breaking News
Breaking News
Foto

संगम चौकात ट्राफिक जाम! करमाळा बसस्थानकाचे गेट तात्काळ उघडा - संजय (बापु )घोलप

बस आगाराने गेट बंद ठेवल्याने संगम चौकात ट्राफिक जाम होत असुन ऐन दिवाळीत व्यापारी ग्राहक, व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने तात्काळ गेट उघडा अन्याथा तीव्र आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी दिला आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करोनाच्या पार्श्वभूमीवर एस-टी सेवा बंद होती त्या मुळे करमाळा आगाराने विज महावितरण च्या बाजुला असलेले गेट बंद केले होते.आता वाहतुक पूर्ववत झाली आसुन करमाळा आगारात राज्यभरातून एस -टी बस येत आहेत.परंतु अजुनही गेट बंद असल्याने संगम चौकात ट्राफीक जाम होत आहे.याचा फटका दिवाळी खरेदी साठी येणारे ग्राहक, प्रवाशी व स्थानिक व्यापाऱ्यांना बसत आहे.

मनसे च्या मागणीला बस आगार सकारात्मक प्रतिसाद देणार का या कडे आता लक्ष लागले आहे.

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

करमाळा येथे बायपास होण्या आगोदर नगर,सोलापूर, टेंभुर्णी,पुणे येथुन येणारी ,जाणारी एस-टी ट्रक,जिप ,ट्रकट्रर यासह सर्व अवजड वाहने संगम चौकातूनच जात येत आसल्याने संगमचौक,भवानी,नाका,पोथरे,नाका या परिसरात तुफान ट्राफीक जाम होत होते,बायपास झाल्यानंतर सर्व अवजड वाहने शहरा बाहेरुन जावु लागल्याने ट्राफीक कमी झाले मात्र अरुंद असलेल्या संगम चौकात एस-टी मुळे मात्र ट्राफीकचा प्रश्न निर्माण होत राहिला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

अखेर सामाजिक कार्यकर्त्यांकडून सततच्या मागणी मुळे विज महावितरण च्या शेजारील बसआगाराची सरंक्षण भिंत तोडुन गेट तयार करण्यात आल्याने संगम चौकाने मोकळा श्वास घेतला होता.मध्यंतरी बस आगाराच्या आडमुठ्या भुमिके मुळे हे गेट बंद केले गेले होते ,सामाजिक कार्यकर्ते व आगार प्रमुखां मध्ये खंडाजंगी उडाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी मध्यस्थी करत हे गेट उघडले होते.परंतु एस टी वाहतुक बंद असल्या कारणाने बंद ठेवलेले हे गेट एस टी वाहतुक सुरळीत झाली तर बंद ठेवल्याने ऐन दिवाळीत संगम चौकात ट्राफिक प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन दिवाळीत व्यापारी ग्राहक, व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने या मागणी साठी आता मनसेने पुढाकार घेतला आहे.गेट न उघडल्यास तीव्र आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी सा चौफेर शी बोलताना दिला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts