loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलिस निरिक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या विरोधात असलेल्या आंदोलनाला राजकीय स्वरुप! सेना भाजप सह राष्ट्रवादीची गटबाजी चव्हाट्यावर.? तालुक्याच्या शांततेत बाधा आल्यास जबाबदार कोण?

करमाळा येथे अवैध धंदे व वाढत्या खोट्या गुन्ह्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे,वंदे मातरम शक्ती सेनेचे सुहास घोलप व कार्यकर्त्यांचे प्राणांतिक उपोषण सुरू असून शिवसेना माजी आमदार नारायण पाटील, उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे ,शिवसेनेचे सभापती गहिनीनाथ ननवरे ,उप सभापती दत्ता सरडे यांनी भाजपच्या या आंदोलनास जाहीर पाठिंबा देवुन पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शिवसेना माजी आमदार नारायण पाटील व सभापती उपसभापती यांचा भाजपाच्या आंदोलनास पाठिंब्या असल्याचे वृत समोर येताच पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या समर्थनार्थ चक्री उपोषण करणार आसल्याचे एक पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्याचे समोर आले आहे. या पत्रावर शिवसेनेकडून तालुका प्रमुख, तालुका संघटक यांच्या सह चक्क भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष व तालुका सरचिटणीस तसेच माजी शहराध्यक्ष यांच्या देखील सह्या आहेत. श्रीकांत पाडुळे यांच्या समर्थनार्थ व्हायरल झालेल्या या पत्रावर पदाधिकाऱ्यांच्या नावासह सह्याचा उल्लेख आहे.या सर्व घडामोडींत मनसे देखील पोलिसांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे.

करमाळा तालुक्यातील या आंदोलनात एस पी तेजस्वी सातपुते लक्ष घालणार का?अशी देखील विचारणा होत आहे.

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

सेना भाजपा बरोबरच राष्ट्रवादी कडुन एका उपजिल्हाध्यक्ष व ओबीसी सेल च्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाला पाठींबा दिला आसताना दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे,यांनी पोलीस निरीक्षक व पोलिसांच्या समर्थनार्थ पत्रक जारी केले आहे.काँग्रेसकडून देखील या आंदोलनात सहभाग घेतला आसुन पोलीस निरीक्षक यांच्या समर्थनार्थ तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे यांनी स्वाक्षरी दिली आहे. सद्ध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असुन राज्यभर सेना ,काँग्रेस, राष्ट्रवादी हातात हात घेवुन काम करत असल्याचे चित्र आसताना करमाळ्यात मात्र महाविकास आघाडीत प्रत्येक गोष्टीत बिघाडी दिसुन येत आहे.सद्या भाजपाच्या आंदोलनास दिलेल्या पाठिंब्या वरुन सेनेसह राष्ट्रवादी व भाजप मधील देखील अंतर्गत धुसफूस व गटबाजी दिसुन आली आहे. भाजपाचे आंदोलन हाणुण पाडण्यासाठीच काही पदाधिकाऱ्यांनी पाडुळे यांच्या कढुन सुपारी घेऊन चक्री उपोषण करण्यात येणार असल्याचा गंभीर आरोप गणेश चिवटे व सुहास घोलप यांनी केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

एकंदरीत करमाळा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पोलीस निरीक्षकांच्या व पोलिसांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात व समर्थनार्थ सर्व पक्षीय राजकिय कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरले आसल्याचे चित्र निर्माण झाले . करमाळा तालुक्यात हि परिस्थिती नेमकी कशामुळे निर्माण झाली? ,तालुक्याच्या कायदा ,शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न नेमका कोणामुळे निर्माण झाला? राजकीय वातावरण गढूळ होवुन तालुक्याच्या शांततेत बाधा आल्यास जबाबदार कोण?असा सवाल आता विचारला जात असुन या प्रकरणात जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते काय भुमिका घेतात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts