loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा कार्यकर्त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली!

करमाळा येथे अवैध धंदे व वाढत्या खोट्या गुन्ह्याच्या विरोधात वंदे मातरम शक्ती सेना व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस असुन अद्याप एक ही मोठा पोलीस आधीकारी उपोषण कर्त्यांकडे फिरकला नाही. दरम्यान आज भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे व वंदे मातरम संघटनेचे सुहास घोलप यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा शहरात व तालुक्यात मटका,जुगार,दारु,व वेश्याव्यवसाय देखील सुरु असुन करमाळा पोलिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असुन अवैध धंदेवाल्यासोबत पोलिसांचे लागे बंधे असल्याचा आरोप केला जात आहे.तसेच पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडूळे यांच्या विरोधात आवाज उठवला तर फाईल बनवेन,अशा धमक्या दिल्या जातात, तसेच गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे शहानिशा न करताच दाखल केले जात असल्याचा आरोप देखील आंदोलन कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत.

सर्व अवैध धंदे बंद असुन व्यक्तिगत स्वार्थासाठी आंदोलनाची स्टंटबाजी करुन वेठीस धरणे कितपत योग्य आहे -पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे

चौफेर प्रतिनिधी /करमाळा शहर

या आंदोलकाच्या या भुमिके बाबत पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांचे मत जाणुन घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवु शकला नाही.मात्र सर्व अवैध धंदे काही दिवसांपासून पुर्ण पणे बंद आहेत, आंदोलक स्टंटबाजी करत आसुन वैयक्तिक स्वार्था साठी आशी भुमिका घेणे कितपत योग्य आहे ?असा सवाल त्यांनी सोशेल मीडियावर व्हटसप च्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दरम्यान जो पर्यंत स्वत:जिल्हा पोलीस प्रमुख येवून संबंधितावर कारवाई चे आश्वासन देवुन ठोस भुमिका घेत नाहीत तो पर्यंत अन्नाचा घास देखील घेणार नसुन कसल्याही परिस्थितीत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा वंदेमातरम चे सुहास घोलप यांनी सा.चौफेर शी बोलताना दिला आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts