पुणे पदवीधर मतदारसंघातुन शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हासंघटक व विद्यमान जिल्हापरिषद सदस्या शैलाताई गोडसे यांना शिवसेनेकडून उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी करमाळा महिला आघाडी च्या तालुका संघटक वर्षाताई चव्हाण यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.
पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर मागील पदवीधर निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवत जोरदार टक्कर देणाऱ्या गोडसे या गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेमध्ये जिल्हा महिला संघटक म्हणून प्रभावी म्हणून काम करीत आहेत. सरपंच ते जिल्हा परिषद सदस्या, जिल्हा नियोजन समिती सदस्या म्हणून त्या सध्या काम करीत आहेत. २०१७ मध्ये विद्यार्थी सेना व इतर संघटनांच्या मदतीने सोलापूर विद्यापीठ पदवीधर निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करून त्यांनी इतर पक्षांसमोर आव्हान उभे केले होते. गोडसे यांना आमदारकीची संधी मिळाल्यास पश्चिम महाराष्ट्रात महिला आघाडीला बळकटी मिळु शकते
.वर्षाताई चव्हाण यांची मागणी.
२०१९ मध्ये झालेल्याविधानसभा निवडणुकीदरम्यान पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार म्हणून त्यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र ती जागा मित्रपक्षाला गेल्याने त्यांना निवडणूक लढविता आली नाही. दरम्यान, मतदारसंघातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन शिवसेना घराघरात पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे त्यांनी केले आहे.पक्षाने त्यांच्या कामाची दखल घ्यावी असे देखील वर्षाताई चव्हाण यांनी सांगीतले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.