loader
Breaking News
Breaking News
Foto

महावितरण च्या गलथान कारभार मुळे दोन एकर उस जळुन खाक! नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्मदहन करणार शेतकऱ्याचा इशारा!

महावितरण च्या गलथान कारभार मुळे करमाळा तालुक्यातील पोंधवडी येथील शेतकरी बाबुराव दगडु कोडलिंगे यांच्या पोंधवडी उमरड शिवेवर उमरड हद्दीत असलेल्या गट नंबर 314/6 या क्षेत्रातील अकरा महिने संभाळलेला दोन एकर उस महावितरणच्या डिपी वर झालेल्या शॉर्ट सर्किट मुळे जळुन खाक झाला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सदरची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली आहे .महावितरण ने पंचनाम्याचे सोपास्कार पार पाडले असले तरी तलाठी या ठिकाणी फिरकले नाहीत.

स्थळ पाहणी करुन पंचनामा केला आहे - श्री जाधव अभियंता करमाळा महावितरण बाबुराव कोडलिंगे यांच्या जळित उसाचा पंचनामा केला असुन सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन वरिष्ठ विभागाकडे आवहाल सादर करणार आहोत.

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

या परिसरात एच ओ डी एस मधुन जवळपास पंधरा डिपींची कामे झाली आहेत मात्र पंधरा व सोळा एच पी च्या डिपीवर तिन एच पी च्या सुद्दा मोटारी चालत नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणने आहे नुकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या शेतात याच योजनेतून 16 hp चा डिपी झालेला आहे .या डिपी वर वारंवार शॉर्ट सर्किट होत होते . संबंधित विभागाच्या आधिकार्यांना वारवंवार तोंडी सांगुन सुद्धा दुरुस्ती केली नाही. अखेर मंगळवारी दुपारी तिन वाजता मोठा बार होवुन स्पार्कींग झाले यात दोन एकर उसासह 280 फुट पाईपलाईन, व ठिबक जळुन सुमारे तिन लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले असल्याची माहिती शेतकरी बाबुराव कोडलींगे यांनी सा करमाळा चौफेर शी बोलताना दिली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

शेतातील जळालेला उस लवकर कारखान्यात गाळपासाठी गेला तर किमान तिस टक्के तरी वजन येवु शकते परंतु चिखलात गेलेला रस्ता लगेच दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्याला तिस हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. उसा ची लागवड,खते,खुरनपी,बांधणी,व आत्ता उस जळाल्याने होणारा घाटा ,उस बाहेर काढण्यासाठी करावा लागलेला तिस हजाराचा खर्च याचा विचार करता शेतकऱ्याच्या हातात झालेला खर्च सुद्धा पडणार की नाही हा सवाल उपस्थित होत आहे. महावितरण च्या गलथान कारभाराचा फटका बसलेल्या कुटुंबाने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा महावितरण च्या कार्यालया समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts