म्हणतात ना, राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर दाद कोणाकडे मागायची? नैसर्गिक दुःखाची दाद तरी कोणाकडे मागायची? ती फक्त सहन करायची.
असाच काहीसा अनुभव चिखलठाण व परिसरातील शेतकऱ्यांना येत आहे. परतीच्या पावसात अनेक शेतकऱ्यांची पिके शेतातील मातीसह वाहून गेली ,अनेकांचे उभे ऊसाचे फड च्या फड पुर्ण पणे झोपले.उसाचे ना पंचनामे ना नुकसानभरपाई. पडलेला उस काढण्यास टोळी वाले पैशाची मागणी करत आहेत पैशे घेतल्या शिवाय उसाला कोयता लावायला तयार नाहीत हे सगळं शेतकऱ्यांनी सहन केलं
या भागातून लाखो रुपयांची वाळु उपसली गेली ,नावा पुरती कारवाई केली गेली या अवैध वाळु उपसा करणार्यांनी लाखोंचा महसुल बुडवला आहे अखेर एसपी तेजस्वी सातपुते यांनी या अवैध वाहतूक करणार्यांचे कंबरडे मोडले आहे
परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न या भागात निर्माण झाला आहे तो म्हणजे रस्त्यांचा .परतीच्या तुफानी पावसाने सगळे रस्ते वाहुन गेले आहेत .शेतातील रस्त्यावर उभ्या आडव्या चार्या पडल्या आहेत.रस्ते मुरुमाने भरल्या शिवाय उस बाहेर काढणे मुश्किल झाले आहे. लोकवर्गणीतून आसपासच्या परिसरातील मुरुम आणण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली असता महसूल विभाग कारवाई चा धाक दाखवत आहे. दिवसा ढवळ्या सहा महिने वाळु उपासा करणाऱ्यावर दिसुन सुद्धा आंधळ्यांची भुमिका घेणारा महसूल विभाग शेतकऱ्यांवर मात्र डोळे वटारत आहे. अवैध वाळु उपसा करणाऱ्यांनी लाखोंचा महसुल बुडवला! शेतकऱ्यांनी मुरुम उचलताच कोणाच्या डोळ्यात खुपला? असा सवाल आता विचारला जात आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.