loader
Breaking News
Breaking News
Foto

पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक

रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली आहे. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतले असून ते अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याआधी अन्वय नाईक यांनी सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे नाव असून पैसे थकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. यानुसार, अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

रिपब्लीक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी हे गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वादाच्या भोवर्‍यात सापडत आहेत. अलीकडेच त्यांनी टिआरपी वाढविण्यासाठी गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, याआधी त्यांच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तथापि, त्यांच्यावर आजवर कारवाई करण्यात आलेली नव्हती. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीकेची झोड उडवल्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची फेर चौकशी करण्याची मागणी केली होती

वैभव फरतडे-मुंबई प्रतिनिधी

दरम्यान, पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा दावा रिपब्लिकने केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा दावाही करण्यात आला आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा रिपब्लिकने केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

रिपब्लीक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून आज पोलिसांनी अटक केली आहे त्या मुळे ठाकरे सरकारचा गोस्वामीला झटकाअसल्याचा बोलले जात आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts