सहा महिने कडक लॉकडावुन करुन सुद्धा एप्रिल पासुन करमाळा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली होती. करमाळा शहरासह जिंती,आळसुंदे, वरकुटे सालसे,पांडे,या गावात कोरोनाचा फैलाव झपाट्याने पसरला होता.
रॅपिड टेस्ट वाढल्यानंतर रुग्ण सापडण्याचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत होते.हा.हा.म्हणता हा आकडा दोनहजार पार झाला होता,मात्र तहसीलदार समिर माने,नगरपालिका मुख्याधिकारी,विणा पवार,पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे,गटविकास आधिकारी श्रीकांत खरात,तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.सागर गायकवाड, डॉ,अमोल डुकरे,सर्व आरोग्य सेवक,सेवीका ,सफाई कामगार, कोवीड योद्धे यांनी केलेले अथक परिश्रम व नागरिकांनी घेतलेल्या खबरदारी मुळे अखेर कोरोनाचा अंत जवळ आला आहे.
करमाळयात मास्क न लावल्यास पाचशे रू दंड आकारण्यात आला आहे
करमाळा तालुक्यात एकुण २२३२ कोरोना बाधित झाले होते त्या पैकी एकुण २१३८रुग्णांनी कोरोनावर यशस्वी पणे मात केली आहे. सध्या करमाळा येथील कोरोना सेंटर मध्ये फक्त ६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मागील काही दिवसात बाधीत होणाऱ्या रुग्णा पेक्षा बरे होणार्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज एकुण २५५टेस्ट घेण्यात आल्या त्यात फक्त १२ जण कोरोणाबाधीत झाले आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.