loader
Breaking News
Breaking News
Foto

कोरोना हरतोय ! करमाळयात फक्त ६५ रुग्ण. काळजी घेण्याचे यांनी केले आवहान.

सहा महिने कडक लॉकडावुन करुन सुद्धा एप्रिल पासुन करमाळा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली होती. करमाळा शहरासह जिंती,आळसुंदे, वरकुटे सालसे,पांडे,या गावात कोरोनाचा फैलाव झपाट्याने पसरला होता.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

रॅपिड टेस्ट वाढल्यानंतर रुग्ण सापडण्याचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत होते.हा.हा.म्हणता हा आकडा दोनहजार पार झाला होता,मात्र तहसीलदार समिर माने,नगरपालिका मुख्याधिकारी,विणा पवार,पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे,गटविकास आधिकारी श्रीकांत खरात,तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.सागर गायकवाड, डॉ,अमोल डुकरे,सर्व आरोग्य सेवक,सेवीका ,सफाई कामगार कोवीड योद्धे यांनी केलेले अथक परिश्रम व नागरिकांनी घेतलेल्या खबरदारी मुळे अखेर कोरोनाचा अंत जवळ आला आहे.

करमाळयात मास्क न लावल्यास पाचशे रू दंड आकारण्यात आला आहे

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

करमाळा तालुक्यात एकुण रुग्ण 2232 एकुण कोरोना बाधित झाले होते त्या पैकी एकुण 2138 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी पणे मात केली आहे .सध्या करमाळा येथील कोरोना सेंटर मध्ये फक्त ६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मागील काही दिवसात बाधीत होणाऱ्या रुग्णा पेक्षा बरे होणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज एकुण २५५टेस्ट घेण्यात आल्या त्यात फक्त १२ जण कोरोणाबाधीत झाले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

नागरिकांकडून सहकार्य लाभल्यास तालुका लवकरच कोरोनामुक्त होईल-विणा पवार -सध्या आपण कोरोना विरुद्ध च्या लढाईत निर्णायक टप्प्यावर पोहचलो आहोत.थोडी जरी बेपर्वाई केली तरी हाताशी आलेला विजय पराजयात बदलु शकतो. त्या मुळे,मास्क वापरा,उघड्यावर थुंकू नका.गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा ,अंगावर दुखणे काढु नका,आजार लपवु नका,असे आवाहन मुख्याधीकारी विणा पवार यांनी सा चौफेर शी बोलताना केले आहेकेले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts