loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रगतीपथावरील स्त्री शक्तीने मागे राहिलेल्या गरीब व गरजू भगिनीकरीता सहयोगाचा हात द्यावा -डॉ.रघुनाथ कुचिक

प्रगतीपथावरील स्त्री शक्तीने मागे राहिलेल्या गरीब व गरजू भगिनीकरीता सहयोगाचा हात द्यावा. असे प्रतिपादन किमान वेतन सल्लागार मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व शिवसेना उपनेते डॉ.रघुनाथ कुचिक यांनी केले प्रबोधन फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने समाजातील शिक्षण आरोग्य प्रशासन समाजकारण इ.परिघात कार्यरत तसेच कोरोना काळातही भरीव काम केलेल्या महिलांच्या 'गौरव आधुनिक दुर्गांचा ' या गौरव सोहळ्यात ते बोलत होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कष्टकरी श्रमीक वंचीत व शेतकरी कुटूंबातील महिला या प्रसंगी पोटाला चिमटा काढून आपली पुढील पिढी घडविन्यासाठी झटत आहेत. त्यांच्यात मला दुर्गचे दर्शन घडते म्हणून तुमच्या दोन पाउले मागे असलेल्या या गरीब अन वंचित भगिनीच्या उत्कर्षकरीता सहयोगाची भूमिका घ्यावी , प्रबोधन फाउंडेशन तुमच्या सोबत आहे . तसेच महिलांच्या वरील वाढते हल्ले चिंताजनक असुन यासाठी घराघरातून सुयोग्य संस्कार अन मानवीय प्रबोधनाची गरज असल्याचे प्रतिपादन कुचिक यांनी पुढे बोलतांना केले

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

स्रीत्व - मातृत्व अन आदर्श भारतीय मातृसत्ताक संस्कृती ही संकल्पनाही त्यांनी विशद केली . यावेळी मेधा ताडपत्रीकर ,शुभांगी चौधर, ज्योती पांडे सुनीता नाशिककर ,मनीषा जाधवर - दराडे ,सुरेखा भालेराव ,वैजयंती मगर ,निता थोरवे, मानसी सावंत ९ महिलांचा सन्मानपत्र , मानाची पैठणी भेट देउन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या अनिता दीक्षित होत्या तर प्रमुख पाहुने म्हणून डॉ गीतांजली घोलप ,प्रा प्रज्ञा कुलकर्णी , जिल्हा कृषी अधिकारी संतोष दराडे ,डॉ रितुपर्ण शिंदे,अड़ अतुल दीक्षित, मा शिरीष फडतरे,विश्वास जगताप,महेंद्र पवार,चंद्रकांत सावंत अदि मान्यवर उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

प्रास्ताविक सौ गायत्री भागवत यांनी तर निवेदन प्रा देवीदास बिनवडे,संदीप वाघमारे, यांनी केले.कार्यक्रम आभार प्रदर्शनाने संपन्न झाला.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts