माणसा- मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना काही ठिकाणी जनावरांना देखील "लंपी स्कीन डिसीज"या आजाराने ग्रासले असल्याने पशुपालकात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पूर्व भागातील काही गावांमध्ये लंपीस्कीन या आजाराने बाधित झालेली जनावरे आढळल्याने काळजीचे वातावरण तयार झाले असून जनावरांना देखील क्वारंनटाईन करण्याची वेळ आली आहे. लंपीस्कीन हा आजार प्रामुख्याने गोवंशिय जनावरांना होत आहे. दमट हवामानात डास, चावणाऱ्या मोठ्या माशा, गोचिड या वेगवेगळ्या किटकांचे उत्पत्ती वाढते व त्यांच्यामुळे या रोगाचा संसर्ग दुसऱ्या जनावरांना पोहोचत आहे. या आजारामध्ये जनावरांच्या त्वचेवर १५ मिमीच्या छोट्या छोट्या गाठी तयार होऊन त्यांना सुज येते व नंतर त्या गाठी फुटून जखमा होत असल्याने जनावरांमध्ये अशक्तपणा येत आहे. मात्र या आजारामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.
या आजाराची लक्षणे म्हणजे प्रथम जनावराच्या डोळ्यातून, नाकातून पाणी येते. सडांना सुज येते, जनावरांना ताप येतो. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. त्वचेवर १० ते १५ मिमी आकाराच्या गाठी तयार होतात. अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ खाजगी किंवा सरकारी डॉक्टरशी संपर्क साधून उपचार घ्यावा. योग्य वेळेत उपचार झाल्यास आठवडाभरात जनावरे पूर्ववत होत असल्याने काळजी करू नये. तसेच या साथीला आळा घालण्यासाठी जनावरांच्या गोठयांचे निर्जंतूककरण करावे. डास, माशा चावू नयेत यासाठी पावडर व औषधाचा वापर करावा व जनावरे स्वच्छ ठेवावीत; असे आवाहन करमाळा तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रविण शिंदे यांनी शेतकऱ्यांना केले आहे
संक्रमण झाल्यानंतर किमान दोन आठवड्यांपर्यंत तो जनावरांच्या रक्तामध्ये राहते मग शरीराच्या इतर भागातही संक्रमण होत जात लसिका ग्रंथीना सूज येते. एक आठवडाभर भरपूर ताप येतो त्वचेवर हळूहळू दहा ते पंधरा मिनिट मी मि च्या गाठी तयार होतात. हा झूनोटिक रोग प्रकारातील आजार नसल्याने जनावरांपासून माणसांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे पशुपालकांनी आजाराला घाबरून न जाता जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून जनावरांना औषधोपचार करून घ्यावा.
पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचे - डॉ.प्रविण शिंदे लंपीस्कीन हा आजार १९२९ ते १९७८ पर्यंत प्रामुख्याने अफ्रिकेत आढळून येत होता. मात्र हळूवारपणे या रोगाने इतर देशात शिरकाव केला आहे. भारतात सदर रोगाची पहिली नोंद ऑगस्ट २०१९ मध्ये ओरिसा राज्यात झाली होती. लंपीस्कीन हा जनावरातील त्वचारोग म्हणून ओळखला जातो. हा रोग शेळ्या मेंढ्यांना होत नसून फक्त गायी व म्हशीमध्ये होत असल्याचे आत्तापर्यंत सिध्द झाले आहे. सध्या भारतात या रोगावरची लस उपलब्ध नसलीतरी शेळ्यांना होणाऱ्या देवी | रोगावर वापरण्यात येणारी लस वापरून हा रोग नियंत्रणात आणू शकतो. या रोगाचा व जंतूचा माणसांना सहसा प्रादुर्भाव होत नाही. परंतु शेतकऱ्यांनी जनावरे हाताळल्यानंतर साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवून काळजी घ्यावी. बाधित जनावरांचे निरसे दूध पिऊ नये.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.