loader
Breaking News
Breaking News
Foto

युवकांच्या हाताला रोजगार देवून सक्षम बनविणार- गणेश चिवटे

तालुक्यातील सुशिक्षित युवकांचा राजकारणासाठी अनेक नेतेमंडळींनी आजपर्यंत फायदा करून घेतला. परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सुशिक्षित बेकार युवकाच्या हाताला रोजगार व शिक्षणाच्या सुखसुविधा निर्माण करून देण्यात प्रस्थापितांना अपयश आले आहे. भविष्यात करमाळा तालुक्यातील सुशिक्षित युवकांच्या हाताला रोजगार व शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी सा.करमाळा चौफेरशी बोलताना सांगितले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी अधिक बोलताना चिवटे म्हणाले, की माजी मंत्री सुभाषबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना दूध व्यवसायाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन दूध व्यवसाय करण्यासाठी सहकार्य केले. त्याव्दारे अनेक सुशिक्षित युवकांना रोजगार मिळवून देण्यात यश आले आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक युवकांना उद्योजक होण्यासाठी आर्थिक सहकार्य केले आहे. भविष्यात कृषीपुरक व्यवसाय उभा करून सुशिक्षित बेकार तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.

या वेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

राजकारणाबरोबरच समाजसेवेचे व्रत स्विकारले असल्याने आजपर्यंत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रोज संध्याकाळी भाजीचे वाटप, अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून निराधारांना भोजन, रमजान निमित्त दूध वाटप तसेच दिपावली निमित्त गोरगरीबांना धान्य वाटप; असे कार्यक्रम राबविले आहेत. गोरगरीब शेतकरी व नागरीकांच्या मुला-मुलींच्या विवाहकरीता सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे भव्य नियोजन करून त्यांना संसारपयोगी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा मानस आहे. राजकारण हे समाजसेवेचे माध्यम असून सामाजिक व राजकीय परिस्थितीची जाणीव असलेल्या युवकांनी भाजपात सामील होऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा.असे आवहान ही चिवटे यांनी केले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

गणेश चिवटे यांनी बजरंग दलाच्या माध्यमातून कार्य सुरू केले. त्यानंतर भारतीय | जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष ते भाजपा तालुका अध्यक्ष या पदावर काम करत असताना नगरसेवक पदावर विजयी होऊन बांधकाम | समितीच्या सभापती विराजमान झाले होते. भविष्यात गाव तेथे शाखा व घर तेथे अभियान राबवणार असून तालुका भाजपा पक्ष बळकट करणार असल्याचे त्यांनी सांगितले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts