loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळयात 'रयत क्रांती व बळीराजाला' खिंडार! तालुकाध्यक्षांचाच 'स्वाभिमानीत' प्रवेश

करमाळा तालुक्यात माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष दिपक शिंदे व बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर ,सामाजिक कार्यकर्ते तानाजी शिंदे यांनी मा.खा.राजु शेट्टी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल , पक्ष जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाहिर प्रवेश केला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

रयत क्रांती व बळीराजा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच स्वाभिमानीत प्रवेश केल्याने दोन्ही संघटनेला खिंडार पडल्याची चर्चा आहे

जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला

चौफेर प्रतिनिधी /शंभुराजे फरतडे ✍

प्रवेशा नंतर बोलताना . खा. राजु शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनाच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देवु शकते असा विश्वास असल्याने प्रवेश केला असल्याचे आण्णासाहेब सुपनवर व दिपक शिंदे यांनी सांगीतले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी स्वाभिमानी च्या पदाधिकाऱ्यांच्या नविन निवडी करण्यात आल्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी रविंद्र गोडगे, जिल्हाउपाध्यक्ष (सोगाव)पदी भाऊसाहेब झोळ ,(वाशिंबे) तालुकाध्यक्ष पदी सुदर्शन शेळके, युवा तालुकाध्यक्ष पदी बापु वाडेकर,पक्ष तालुकाध्यक्ष पदी बापु फरतडे (सातोली) उपाध्यक्ष पदी नितिन शिंदे यांची वर्णी लागली आहे. या वेळी युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे,पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, युवा नेते रणजित बागल,पक्ष जिल्हा कार्याध्यक्ष आदिनाथ परब,माढा तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts