loader
Breaking News
Breaking News
Foto

  अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना तात्काळ एकरी 50हजार रूपये मदत जाहीर करा- अंगद देवकते

 महाराष्ट्रभर परतीच्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे, शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्याना सरसकट एकरी ५०,००० रू. नुकसान भरपाई थेट शेतक-यांच्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राष्ट्रनायक मा. आ. महादेवजी जानकर,पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ए.एल.अक्कीसागर साहेब, राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा तालुका अध्यक्ष अंगद देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली आज करमाळा तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा तहसीलदार समीर माने यांनी अंदोलन ठिकाणी भेट घेऊन निवेदन स्विकारले.यावेळी तहसीलदार समीर माने म्हणाले की, आम्ही सर्व तलाठ्यांना शेतकर्याच्या बांधांवर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.आम्ही लवकरच अहवाल शासनाला पाठवू.

या वेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

चौफेर प्रतिनिधी

यावेळी रासप तालुका अध्यक्ष अंगद देवकते म्हणाले की तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतीसह जमीन वाहुन गेली आहे, शेतातील केळी,पपईसह फळबागा पूर्णपणे उध्दवस्त झाल्या असून खरीप पिके पूर्ण पाण्यासोबत वाहून गेली आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे मुकी जनावरे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली आहे त्यामुळे थेट शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रूपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करण्यात यावे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्यास प्रवृत्‍त होईल याला सर्वस्वी जबाबदार आपले प्रशासन राहील असे ही अंदोलन वेळी तालुका अध्यक्ष अंगद देवकते यांनी सांगीतले   या निवेदनाच्या प्रती मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई ,मा. पालकमंत्री सोलापूर, जिल्हाधिकारी साहेब सोलापूर, कृषी अधिकारी करमाळा,पोलीस निरीक्षक करमाळा यांना निवेदन पाठवले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी रासप तालुका अध्यक्ष अंगद देवकते, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, तालुका उपाध्यक्ष राम धायतोंडे,बाळासाहेब टकले,विठ्ठल शिंदे ता.सरचिटणीस शंकर सुळ,बंडू कुराडे,राहुल आटोळे,सोनबा गावडे,विठ्ठल खांडेकर, रावसाहेब बिनवडे,विठ्ठल भिसे, अंकुश शिंदे,हरिचंद्र कनिचे,हरिचंद्र मंगवडे, प्रफुल्ल दामोदर,नितीन दामोदर,इत्यादी रासप पदाधिकारी कार्यक्रर्ते अंदोलनास उपस्थितीत होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts