loader
Breaking News
Breaking News
Foto

वडिलांच्या अंत्यवीधीला कोणीच आले नाही, म्हणुन चिडलेल्या मुलांनी केले भयानक कृत्य. वाचुन व्हाल थक्क!

मृत वडिलांच्या अंत्यवीधीस शेजारचे कोणीच आले नाही तसेच वडिलांच्या मृत आत्म्यास शांती मिळावी यासाठी मुलांनी एका वृद्धाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंडमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावंडांसह हत्येची सुपारी घेणाऱ्या चौघांना अटक केली आहे. अंधश्रद्धेपोटी आणखी दोघांची देखील हत्या करणार होते, अशी माहिती समजली आहे. मुलुंडच्या विजयनगर परिसरात दुकानाबाहेर झोपलेल्या मारुती गवळी (७०) यांची २ ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांची पाच पथके तयार करुन अहोरात्र तपास सुरु होता. मात्र आरोपी कोण आहेत, याचे धागेदोरे हाती लागले नव्हते.

पोलीसांनी खाक्या दाखवताच आरोपीनी दिली धक्कादायक कबुली .पोलीसांमुळे वाचला दोघांचा जिव

विशेष प्रतिनिधि- मुंबई

त्याचवेळी याच परिसरात राहणारे दीपक मोरे आणि विनोद मोरे हे दोघे भाऊ वडिलांच्या निधनाने व्यथित असल्याचे समजले. पोलिसांनी या दोन भावांवर लक्ष केंद्रित केले. मोरे यांच्या वडिलांच्या अंत्यविधीला कुणीच आले नव्हते. तसेच परिसरातील लोकांनीच करणी केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा त्यांचा समज झाला होता.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

एका मांत्रीक व्यक्तीने वडिलांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी बळी द्यावे लागतील असे त्यांना सांगितले होते. दीपक आणि विनोद अंधश्रद्धेला बळी पडल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून कबुली देण्यात आली.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts